शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Diwali Fashion : ‘या’ ५ रंगांचे ब्लाऊज होतात कुठल्याही साडीवर मॅचिंग, दिवाळीत ब्लाऊज मॅचिंगचं टेंशनच विसरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2025 17:22 IST

1 / 7
सण-उत्सव आले की कपड्यांची चंगळ असते. विविध प्रकारचे कपडे आपण वापरतो. मात्र सणासुदीच्या दिवशी साडी तर नेसायला हवीच. साडीसारखे सौंदर्य कोणत्याही कपड्यांना नाही.
2 / 7
साडीचे वैशिष्ठ्य म्हणजे कोणाचीही साडी कोणालाही नेसता येते. त्यात आकार, माप, उंची याचा फरक पडत नाही. मैत्रिणीची, आईची, आजीची कोणाचीही साडी नेसता येते. प्रश्न फक्त ब्लाऊजचा असतो. त्यामुळे हे ५ रंगाचे ब्लाऊज शिऊन घ्या कोणत्याही साडीवर चालतात.
3 / 7
काढा पदराची साडी सणाला नेसली जाते. सोनेरी काढाची साडी कोणत्याही रंगाची असली तरी त्यावर सोनेरी रंगाचा ब्लाऊज सुंदर दिसतो. त्यामुळे एक सोनेरी ब्लाऊज असावा.
4 / 7
आजकाल कॉटनची साडी नेसली जाते. कॉटनच्या साडीवर पांढऱ्या रंगाचा ब्लाऊज मस्त दिसतो. साधा किंवा डिझाइनर असा ब्लाऊज वापरा.
5 / 7
काळ्या रंगाचा ब्लाऊज कोणत्याही साडीवर घालता येतो. सगळ्याच साड्यांवर छान वाटत नाही मात्र बऱ्याच साडींवर घालता येतो. तसेच दिसतोही मस्त.
6 / 7
ऑफ व्हाइट रंगाचा ब्लाऊज सध्या ट्रेंडींग आहे. त्यात अनेक प्रकार मिळतात. तसेच गडद रंगाच्या साडीवर खास छान दिसतो. नक्की वापरा.
7 / 7
सोनेरी प्रमाणे चंदेरी रंगाचा ब्लाऊजही मिणतो. आजकाल चंदेरी काठांची साडीही फार लोकप्रिय आहे. त्यामुळे चंगृदेरी काठाच्या कोणत्याही साडीवर चंदेरी रंगाचा ब्लाऊज घालता येतो. नक्की जवळ असावा.
टॅग्स :saree drapingसाडी नेसणेfashionफॅशनSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया