Diwali 2025 : दिवाळीत पाण्यावर लावा दिवे, ना तेल वाया जाणार-ना तूप, घर उजळून जाईल प्रकाशाने
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 15:33 IST2025-10-17T15:21:28+5:302025-10-17T15:33:12+5:30
Diwali 2025 : हे दिवे बॅटरीवर चालतात आणि बॅटरी कधीही बदलता येतात. त्यामुळे तुम्ही हे दिवे दरवर्षी वापरू शकता.

पाण्यावर चालणारे दिवे प्रामुख्यानं दोन प्रकारांचे असतात आणि दोन्हींची कार्य करण्याची पद्धत वेगवेगळी असते. या दिवाळीत तुम्ही सुंदर असे पाण्यावर चालणारे दिवे विकत घेऊ शकता. ( Water Sensor Diya LED Water Sensor Diya)
हे दिवे पूर्णपणे इलेक्ट्रिक असतात आणि पाणी टाकल्यावर लगेच प्रकाशित होतात. ( Water Sensor Diya )
या दिव्यांमध्ये एलईडी बल्ब, लहान बॅटरी आणि इलेक्ट्रॉनिक सर्किट असते आणि दोन धातूची टोकं असतात.
पारंपारीक दिव्यांमुळे धूर होतो पण एलईडी दिवे धुरविरहीत असतात ज्यामुळे घरात स्वच्छ हवा राहते.
यामध्ये तेल किंवा तूप लागत नसल्यामुळे सांडण्याचा किंवा तेलकटपणाचा प्रश्नच येत नाही.फक्त १ चमचा पाणी घातले तरी आपोआप सुरू होतात.
पाणी टाकल्यावर दिवा आपोआप सुरू होतो. हे तंत्रज्ञान लोकांना खूपच नवीन आणि आकर्षक वाटते.
हे दिवे पणती, कमळ, स्वास्तिक अशा वेगवेगळ्या आकारांमध्ये असतात.
हे दिवे बॅटरीवर चालतात आणि बॅटरी कधीही बदलता येतात. त्यामुळे तुम्ही हे दिवे दरवर्षी वापरू शकता.