Diwali 2025 : दिवाळीसाठी ३०० रूपयांत घ्या 'फिटेड बेडशीट'; ना सरकणार- ना चुरगळणार, रॉयल लूक मिळेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 20:30 IST2025-10-05T20:18:06+5:302025-10-05T20:30:01+5:30
Diwali 2025 (Cotton Fitted Bedsheet) : या बेडशीटच्या चारही बाजूंना इलास्टीक असते.गादीच्या खाली जाऊन कोपऱ्यांना घट्ट पकडते आणि अजिबात सरकत नाही.

दिवाळी (Diwali 2025) म्हटलं की खरेदी आलीच तुम्ही या दिवाळीला साध्या कॉटनच्या बेडशीट न घेता अडजस्टेबल म्हणजेच फिटेड बेडशीट घेऊ शकता. या बेडशीट तुमच्या बेडशीटला रॉयल लूक देतील आणि बेडरूमही छान दिसेल. (Buy Cotton Fitted Bedsheet For Diwali)
साध्या बेडशीटच्या तुलनेत ही बेडशीट तुमच्या गादीला व्यवस्थित फिट होते, वारंवार सरकत नाही किंवा चुरगळतही नाही. (Cotton Fitted Bedsheet New Collection)
सॅटीन फिनिशिंगची कॉटनची बेडशीट तुम्ही निवडू शकता. आरामदायक कापड असेल असं पाहा. ३०० रूपयांपासून ते ७०० रूपयांपर्यंत तुम्हाला आरामदायक बेडशीट मिळेल.
या बेडशीटच्या चारही बाजूंना इलास्टीक असते. गादीच्या खाली जाऊन कोपऱ्यांना घट्ट पकडते आणि अजिबात सरकत नाही.
दिवाळीच्या निमित्तानं तुम्ही घरातील पडदे आणि फर्निचर यांच्याशी जुळवून बेडशीटची निवड केली तर अधिकच उठून दिसेल.
बेडशीट खरेदी करताना मशीन वॉशसाठी योग्य आहे की नाही ते तपासून पाहा.तसंच बेडशीट धुताना रंग जाणार नाही असं पाहा.
जर गादी जाड असेल तर डीप पॉकेट किंवा एस्ट्रा डीप पॉकेट बेडशीट निवडा.
बेडशीट ऑनलाईन खरेदी करत असाल तर रिटर्न पॉलिसी तपासून पाहा.