फेशियल, क्लिनअप करूनही चेहरा काळवंडलेलाच? 'या' व्हिटॅमिन्सचे पदार्थ खा, त्वचा होईल तुकतुकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2025 09:35 IST2025-11-04T09:33:14+5:302025-11-04T09:35:02+5:30

चेहरा काळवंडला की आपल्याला वाटतं त्वचा टॅन झाली आहे. त्यामुळे मग आपण फेशियल, क्लिनअप किंवा इतर काही घरगुती उपाय करतो.

पण तरीची चेहऱ्याचा काळवंडलेपणा कमी झालेला आहे, असं जाणवत नाही. याचं कारण म्हणजे तुम्हाला फेशियल, क्लिनअपसारख्या वरवरच्या उपायांची गरज नसून तुमच्या शरीराला आतून पोषण मिळण्याची गरज आहे.

जर आपल्या आहारात काही पौष्टिक घटकांची कमतरता असेल तर त्याचा परिणाम आपल्या त्वचेवरही होतो आणि त्वचेचा रंग, पोत बिघडत जातो.

त्यापैकी एक आहे व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन बी १२. व्हिटॅमिन ई त्वचेसाठी अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे बदाम, अक्रोड, जवस असे व्हिटॅमिन ई देणारे पदार्थ नियमितपणे खा.

त्याचबरोबर व्हिटॅमिन सी देखील तुमच्या आहारात पुरेशा प्रमाणात असायला हवं. त्यामुळेही त्वचा चमकदार, तरुण राहण्यास कदत होते.

याशिवाय लोह, प्रोटीन्स हे घटकही तुमच्या आहारात असायला हवे. कारण त्यांच्या कमतरतेमुळे अशक्तपणा जाणवतो आणि तो लगेचच आपल्या त्वचेवर दिसू लागतो. चेहरा काळवंडून मलूल झाल्यासारखा भासतो.