शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्यात कुंडीतल्या रोपांना पाणी घालण्याची याेग्य वेळ कोणती? रोपं जळू नयेत म्हणून काय काळजी घ्यावी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2026 14:48 IST

1 / 6
उन्हाळ्यात रोपं सुकू नयेत यासाठी त्यांना पाणी घालण्याची योग्य वेळ आणि पद्धत आपल्याला माहिती हवी...(correct timing for watering plants in summer season)
2 / 6
उन्हाळ्यात बऱ्याचदा असं दिसून येतं की रोपांना पुरेसं पाणी देऊनही त्यांची वाढ चांगली होत नाहीये. ती सुकून गेल्यासारखी दिसत आहेत किंवा पानं कोरडी पडली आहेत. याचा अर्थ असा असतो की रोपांना पाणी देण्याची पद्धत किंवा प्रमाण चुकत आहे.
3 / 6
उन्हाळ्यात रोपांना शक्यतो सकाळी लवकर म्हणजेच १० वाजेच्या आधीच पाणी घाला. यामुळे पाणी मातीमध्ये टिकून राहाते. नाहीतर उशिरा पाणी दिल्यास उष्णतेमुळे लगेच त्याचं बाष्पीभवन होतं आणि माती लवकर कोरडी पडते.
4 / 6
कुंडीतल्या मातीमध्ये पेबल्स, झाडांची गळालेली पाने, खापर किंवा दगड विटांचे तुकडे टाकून ठेवा. यामुळे कुंडीतली माती जास्त वेळ ओलसर राहण्यास मदत होते.
5 / 6
ज्या ठिकाणी रोपांना खूप ऊन लागत आहे, अशा ठिकाणी रोपं ठेवणं टाळा. उन्हाळ्यात त्यांची जागा बदला. त्यामुळे उन्हापासून रोपांचं संरक्षण होईल.
6 / 6
कुंडीतल्या मातीमध्ये तर पाणी घालाच, पण एक दिवसाआड पानांवर पाणी शिंपडा. यामुळे रोपांना थोडं दमट वातावरण मिळतं आणि त्यामुळे त्यांची वाढही चांगली होते.
टॅग्स :Gardening Tipsबागकाम टिप्सPlantsइनडोअर प्लाण्ट्सWaterपाणीSummer Specialसमर स्पेशल