हात न लावता कणिक भिजवण्याची पाहा १ भन्नाट ट्रिक, २ मीनिटांत मळा चपातीचं पीठ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2024 12:47 IST2024-11-10T19:48:27+5:302024-11-11T12:47:25+5:30
Cooking Hacks : पीठ मळण्याचं काम आता होईल सोपं.

किचनमध्ये जायचं म्हटलं की अनेकांना कंटाळवाणं काम वाटतं कारण एकदा किचनमध्ये गेल्यानंतर काम करून करून घामाघूम व्हायला होत आणि हात, कपडे खराब होतात ते वेगळंच.
भाजी, चपातीसह सर्व स्वंयपाक करताना चपात्या करणं खूप किचकट वाटतं कारण पीठ मळण्यापासून चपाती शेकण्यापर्यंत २-३ स्टेप्स व्यवस्थित कराव्या लागतात तरच चपाती परफेक्ट होते.
भारतात सर्वाच्याच घरी चपात्या खाल्ल्या जातात. चपात्या करण्यासाठी गव्हाचं कणीक मळावं लागतं. अनेकांना कणीक मळताना पाण्याचा अंदाज व्यवस्थित न समजल्यामुळे पीठ जास्त सैल किंवा घट्ट होतं आणि हात खराब होतात ते वेगळंच.
हाताला पीठ न लावता मऊ कणीक मळण्यासाठी सोपी ट्रिक पाहूया. ही ट्रिक वापरल्यास तुमचं पीठ मळण्याचं काम होईल आणि हातही चांगले राहतील.
बोटांनी पीठ व्यवस्थित एकजीव करून त्यात हळूहळू पाणी घालून पीठ मळलं जातं. पण हात खराब न करतासुद्धा तुम्ही पीठ मळू शकता यासाठी सोपी प्रक्रिया माहित करून घ्या.
एका प्लास्टीकच्या पिशवीत थोडं पाणी, थोडं पीठ घालून कणीक मळून घ्या. सुरूवातीला पीठ पिशवीला चिकटेल नंतर पीठ व्यवस्थित मळून झाल्यानंतर पिशवीला चिकटणार नाही.
त्यानंतर पिशवी काढून हातानं मळून कणीक एकजीव करून घ्या. पिशवी काढण्याआधी पिठ व्यवस्थित एकजीव झालेलं असेल याची काळजी घ्या.
अर्धवट मळून झालेलं असताना पिशवी काढली तर हात पुन्हा खराब होतील.