सगळं आलबेल तरी गोड नाही! २०२५ मध्ये स्मृती मानधना-पलाश मुच्छलसारख्या 'या' ५ जोड्यांच्या नात्याला लागला ब्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2025 18:00 IST2025-12-24T18:00:00+5:302025-12-24T18:00:02+5:30
celebrity breakups 2025: Bollywood celebrity breakups: famous couples breakup news: स्मृती मानधना पलाश मुच्छलसह ‘या’ स्टार जोड्या झाल्या वेगळ्या..

२०२५ हे वर्ष सेलिब्रिटी प्रेमकथांसाठी फारसं चांगलं नव्हतं. लग्नाच्या चर्चा रंगत असताना अचानक ब्रेकअप झालं. असं ऐकलं की चाहत्यांना धक्का बसणं स्वाभाविक आहे. सोशल मीडियावर रोमँटिक पोस्ट, एकत्र कार्यक्रमांना हजेरी, कुटुंबीयांची ओळख, लग्नाच्या अफवा. सगळं काही सुरळीत सुरु असताना काही लोकप्रिय जोडीने वेगळा होण्याचा निर्णय घेतला.

२०२५ मध्ये लग्नाच्या चर्चांदरम्यान अचानक वेगळे झालेले स्मृती मानधना–पलाश मुच्छल यांच्यासह वेगळे झालेल्या ५ जोड्यांबद्दल जाणून घेऊया.

२०२५ च्या सुरुवातीला धनश्री वर्मा आणि युजवेंद्र चहल यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या होत्या.अनेक महिने वेगळे राहिल्यानंतर यांनी फेब्रुवारी २०२५ मध्ये वेगळा होण्याचा निर्णय घेतला.

२०२५ च्या सुरुवातीला ब्रेकअप करण्यापूर्वी तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा हे मनोरंजन क्षेत्रातील सर्वात लाडक्या जोडप्यांपैकी एक होते. पण नंतर काही कारणांमुळे त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचे लग्न आयत्यावेळी मोडले. कुटुंबातील समस्या आणि फसवणुकीच्या अफवांमुळे लग्न मोडल्याची चर्चा आहे.

'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम ही जोडी लता सभरवाल आणि संजीव सेठ यांनी देखील विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

सेलिना जेटली आणि पीटर हाग यांनी वर्षाच्या सुरुवातीला घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. शारीरिक आणि मानसिक छळ केल्यामुळे तिने वेगळा होण्याचा निर्णय घेतला.

















