V Neck ब्लाऊजचा ट्रेंड! साडी-लेहेंग्यावर दिसेल शोभून, पुढच्या गळ्यासाठी ५ लेटेस्ट पॅटर्न- दिसाल झक्कास..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2025 19:00 IST2025-12-05T19:00:00+5:302025-12-05T19:00:02+5:30

V neck blouse design: V neck saree blouse: Latest V neck blouse designs: आपल्यालाही लग्न समारंभात किंवा पार्टीसाठी ब्लाऊजचे पॅटर्न सिलेक्ट करायचे असेल तर हे ५ लेटेस्ट पॅटर्न पाहा.

सध्या ब्लाऊजचे अनेक पॅटर्न ट्रेंडमध्ये आहेत. पण लग्नसमारंभात, फेस्टिव्ह सीझनमध्ये किंवा कुठल्याही खास फंक्शनमध्ये पाहिलं तर बहुतेक महिलांच्या लुकमध्ये कॉमन गोष्ट दिसते ती म्हणजे आकर्षक V Neck ब्लाऊज. साडी असो वा लेहेंगा V Neck हा पॅटर्न असा आहे की कोणत्याही आउटफिटला एकदम स्टायलिश, स्लीक आणि ग्लॅमरस टच देतो. (V neck blouse design)

V Neck मध्ये आपल्या बॉडीचा शेप बदलतो. मान लांब, चेहरा आणि बॉडी एका फ्रेममध्ये दिसते. भारी साडी किंवा लेहेंग्यावर हा लूक खुलून दिसतो. जर आपल्यालाही लग्न समारंभात किंवा पार्टीसाठी ब्लाऊजचे पॅटर्न सिलेक्ट करायचे असेल तर हे ५ लेटेस्ट पॅटर्न पाहा. (V neck saree blouse)

क्लासिक डीप व्ही नेक ब्लाऊज हा पॅटर्न साडी असो वा लेहेंगा. यावर हे ग्रेसफुल, एलिगंट दिसते. फ्रंट V कटमध्ये बॉर्डर दिली की लुक अजून उठून दिसतो.

एम्बेलिश्ड V-नेक हा सीक्विन, मोती किंवा झरीच्या साडीवर शोभून दिसतो. हा ब्लाऊज कोणत्याही पार्टी लुकला रॉयल टच देतो.

आपल्याला जर सडपातळ दिसायचे असेल तर ब्रॉड V-नेक ब्लाऊज पॅटर्न ट्राय करता येईल. ज्यामुळे आपला लूक अधिक खुलून दिसेल.

पार्टी वेअर किंवा लग्नसमारंभात आपण लेस V-नेक ब्लाऊज ट्राय करायला हवे. व्ही नेकवर लेस लावता येईल. ज्यामुळे ब्लाऊज क्लासी दिसेल.

स्टाईलिश कॉलर V-नेक आपल्या पार्टी लूकला इंडो-वेस्टर्न लूक देईल. लेहेंग्यासोबत हा लूक सुपर-ग्लॅमरस दिसतो.

डबल-लेयर्ड V-नेकमुळे आपला लूक अधिक मॉर्डन दिसतो. आपल्याला सिंपल व स्टायलिश लूक हवा असेल तर हा बेस्ट पर्याय आहे.

मिरर वर्क V-नेक हा आपल्या ब्लाऊजला परफेक्ट फ्रेम देतो. कलरफुल लेहेंगा किंवा बांधणी साडीवर छान दिसतो.