रात्री झोपताना हवेत कम्फर्टेबल कपडे, पाहा नाईटवेअरचे ५ सुंदर पॅटर्न-मोकळेढाकळे आणि सुटसुटीत...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2025 11:45 IST2025-08-17T11:40:00+5:302025-08-17T11:45:01+5:30
Best Ladies Nightwear Clothes Options : Comfortable Nightwear For Women : Stylish Nightwear Options For Ladies : Nightdress Best Option For Ladies : Trendy Women’s Sleepwear : रात्री झोपताना नाईटी किंवा मॅक्सीऐवजी काहीतरी वेगळे आणि सुटसुटीत घालता येतील असे कपड्यांचे पॅटर्न...

रात्रीची झोप ही आपले शरीर आणि मन दोन्ही ताजेतवाने व फ्रेश करण्यासाठी (Nightdress Best Option For Ladies) अत्यंत महत्त्वाची असते. यासोबतच, झोपताना घातलेले कपडे या कम्फर्टमध्ये मोठी भूमिका बजावतात. रात्री झोपताना शक्यतो मोकळेढाकळे, सुटसुटीत, कम्फर्टेबल तसेच झोपताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही असेच कपडे घालणं पसंत करतात.
अनेक महिलांना नाईटी किंवा मॅक्सीऐवजी काहीतरी वेगळे आणि सुटसुटीत (Best Ladies Nightwear Clothes Options) असे कपडे घालायचे असतात, जे झोपताना त्रासदायक ठरणार नाहीत व मोकळेपणाने झोपता येईल. अशावेळी योग्य फॅब्रिक, सैलसर आणि हवेशीर, मोकळे असलेले कपडे हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो.
रात्रीची शांत झोप मिळवण्यासाठी आरामदायक कपडे घालणे खूप महत्त्वाचे (Comfortable Nightwear For Women) असते. अनेक महिलांना नाईटी किंवा मॅक्सी घालणे सोयीचे वाटत नाही. अशा वेळी, इतर अनेक पर्याय उपलब्ध आहेत, जे तुम्हाला रात्रीच्या वेळी आरामदायी आणि स्टाईलिश लुक देतील. महिलांसाठी रात्रीच्या वेळी झोपताना घालता येतील असे आरामदायी आणि स्टायलिश कपड्यांचे काही उत्तम पॅटर्न पाहूया.
१. रॉम्पर नाईटसूट :-
आपण रात्री झोपताना अशा प्रकारचा स्टायलिश आणि सुंदर, मोकळाढाकळा रॉम्पर नाईटसूट घालू शकतो. हा जम्पसूटसारखाच एक प्रकार असतो. सुटसुटीत आणि थोडासा मोकळाढाकळा आणि स्पोर्टी लूक सुद्धा मिळतो. अंगकाठी बारीक असणाऱ्या मुलींसाठी हा उत्तम पर्याय आहे.
२. टी - शर्ट आणि पजामा :-
आपण रात्री झोपताना एखादा लूज किंवा ओव्हर साईज टी - शर्ट आणि पजामा घालू शकतो. वेगवेगळ्या प्रिंट्सचे आणि लो वेस्ट पजामा म्हणजे एकदम परफेक्ट असे कॉम्बिनेशन. टी - शर्ट आणि पजामा सुटसुटीत, मोकळे असल्याने रात्री झोपही छान लागते.
३. स्लिप शर्ट्स :-
नाईटी किंवा मॅक्सी, गाऊन ऐवजी स्लिप शर्ट्स देखील एक उत्तम पर्याय ठरु शकतो. साधारणतः गुडघ्या पर्यंतच्या हाईट्सचे हे शर्ट्स खूपच ट्रेंडी लूक देतात. यात वेगवेगळ्या रंगांचे आणि प्रिंट्सचे असे स्लिप शर्ट्स खूप छान दिसतात. यातही वेगवेगळ्या मटेरियलचे असे स्लिप शर्ट्स बाजारात अगदी सहज उपलब्ध होतात, परंतु रात्री झोपण्यासाठी शक्यतो कॉटनच्याच कापडाचे स्लिप शर्ट्स वापरणे फायदेशीर आणि कम्फर्टेबल ठरते.
४. रिबेड नाईट वेअर :-
रिबेड नाईट वेअर हा रात्री झोपताना घालण्यासाठीच्या वेगवेगळ्या कपड्यांच्या पॅटर्नपैकी एक बेस्ट आणि उत्तम पर्याय आहे. याचे कापड हे स्ट्रेचेबल असते तसेच दिसायला ते को - ऑर्ड सेट सारखेच दिसतात. रात्री झोपण्यासाठी जर तुम्ही अगदी कम्फर्टेबल कपड्यांचा विचार करत असाल तर हा एक बेस्ट ऑप्शन आहे.
५. कफ्तान नाईटवेअर :-
कफ्तान नाईटवेअर गाऊन हा सुद्धा एक उत्तम पर्याय आहे. हे कफ्तान गाऊन अगदी सुटसुटीत, मोकळे आणि लूज असतात. लूज फिटिंग आणि प्लस साईझ महिलांसाठी ते सगळ्यात बेस्ट आहेत.