गुलाबाच्या कुंडीत खोचून ठेवा कांदा, गुलाबाला येतील फुलंच फुलं, पाहा नेमकं काय करायचं...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2026 14:50 IST2026-01-09T14:40:46+5:302026-01-09T14:50:51+5:30

गुलाबाचं रोप कित्येकजण हौशीने आपल्या अंगणात, बाल्कनीमध्ये लावतात. कारण गुलाबाचं टपोरं फुलं पाहताच मन प्रसन्न होऊन जातं.(home hacks for the fast growth of rose plant)

पण काही वेळा असा अनुभव येतो की गुलाबाचं रोप नुसतंच वाढतं. त्याला अजिबातच फुलं येत नाहीत. कधी तरी कितीतरी महिन्यांतून एकदा एखादी कळी उमललेली दिसते...(tips to get maximum flowers from rose plant)

म्हणूनच आता यावरचा एक सोपा आणि स्वस्तात मस्त घरगुती उपाय पाहा. हा उपाय केल्याने तुमच्या गुलाबाच्या रोपाची वाढ तर चांगली होईलच पण त्याला भरपूर फुलंही येतील.

हा उपाय करण्यासाठी गुलाबाचं रोप ज्या कुंडीमध्ये आहे त्या कुंडीमधल्या मातीत एक कांदा खोचून ठेवा (benefits of onion for flowering plants). खूप जास्त खोल खाेचू नये. अर्धा कांदा मातीमध्ये आणि अर्धा वर राहील या पद्धतीने खोचावा.

कांद्यामध्ये असणारे घटक रोपाची वाढ होण्यासाठी आणि त्याला फुलं येण्यासाठी मदत करतात.

तर कांद्यामध्ये असणारं सल्फर रोगावर किडा, मावा, बुरशी पडू देत नाही. एखाद्या जंतुनाशकाप्रमाणे कांदा रोपांसाठी काम करतो. हा उपाय kesarkumari1992 या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
















