शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

सकाळी उठल्यानंतर ब्रश न करता पाणी प्यायल्यानं काय होतं? ७ फायदे, निरोगी राहाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 17:00 IST

1 / 7
सकाळी उठल्यानंतर तोंड न धुता पाणी पिणं ही आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर सवय मानली जाते. यामुळे शरीराला बरेच फायदे मिळतात. (Benefits Of Drinking Water After Waking Up without Washing Mouth)
2 / 7
रात्री झोपेत आपल्या तोंडात लाळ तयार होते. यात पाचक एन्जाईम्स असतात. पाणी प्यायल्यानं ही लाळ पोटात जाते आणि पचनक्रिया सुधारते.
3 / 7
शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघण्यास मदत होते. ज्यामुळे रक्त शुद्ध होते आणि शरीर नैसर्गिकरित्या डिटॉक्स होण्यास मदत होते.
4 / 7
ज्यांना बद्धकोष्टतेचा किंवा गॅसचा त्रास आहे त्यांच्यासाठी हे रामबाण औषध आहे. यामुळे सकाळी पोट साफ होण्यास मदत होते.
5 / 7
रक्ताभिसरण सुधारल्यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होतात आणि त्वचा तजेलदार आणि निरोगी दिसते.
6 / 7
लाळेतील नैसर्गिक बॅक्टेरियाज शरीराची इम्युनिटी वाढवतात. ज्यामुळे आजारांशी लढण्यास मदत होते.
7 / 7
सकाळी रिकाम्यापोटी पाणी प्यायल्यानं शरीराचा मेटाबॉलिझ्म रेट वाढतो. ज्यामुळे कॅलरीज लवकर जळतात आणि डोकेदुखीचा त्रास कमी होतो.
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सLifestyleलाइफस्टाइल