फक्त एकदाच बिटाचा रस चेहऱ्याला ‘या’ पद्धतीने लावा, मिळेल इंस्टंट ग्लो- चेहरा उजळेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2025 15:00 IST2025-06-24T12:12:29+5:302025-06-24T15:00:53+5:30

चेहऱ्यावर इंस्टंट ग्लो येण्यासाठी बीटरुरचा रस खूप उपयुक्त ठरू शकतो...
बीटरुट जसे आरोग्यासाठी उत्तम मानले जाते, तसेच ते आपल्या त्वचेसाठीही खूप गुणकारी ठरते. चेहऱ्यावरचे टॅनिंग कमी करून त्वचेवर इंस्टंट ग्लो येण्यासाठी पुढे सांगितलेल्या पद्धतीने एकदा बीटरुट वापरून पाहा.
हा उपाय करण्यासाठी बीटरुटचे काप मिक्सरमधून फिरवून त्याचा रस काढून घ्या. आता १ चमचा बीटरुटच्या रसामध्ये १ चमचा कॉफी पावडर घाला.
आता हा लेप तुमच्या चेहऱ्यावर लावा आणि हलक्या हाताने चोळून मालिश करा. हा लेप तुमच्या त्वचेसाठी स्क्रबरप्रमाणे काम करेल. यामुळे डेडस्किन, टॅनिंग निघून जाईल आणि त्वचा स्वच्छ होईल.
व्हाईटहेड्स, ब्लॅकहेड्स काढण्यासाठीही हा उपाय उपयुक्त ठरतो.
यानंतर बीटरुटच्या रसामध्ये थोडे गव्हाचे पीठ आणि थोडे बेसन घालून कालवा. हा फेसमास्क चेहऱ्याला लावा. १० ते १२ मिनिटांनी चेहरा धुवून टाका. त्वचेमध्ये खूप छान फरक जाणवेल.