Bajuband Design : लग्नसराईसाठी बाजूबंदाचे खास कलेक्शन; दंडांवर शोभून दिसतील अशा १० नवीन डिजाईन्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 16:06 IST2025-01-18T15:44:21+5:302025-01-18T16:06:10+5:30
Bajuband Jewellery Collection : नऊवारी किंवा साहावारी काठाच्या साडीवर बाजूबंद शोभून दिसते. या दागिन्याचा इतिहासही राजेशाही आहे.

लग्नसमारंभ किंवा कोणत्याही खास प्रसंगांना बाजूबंद (Bajuband Jewellery Collection) हा दागिना परिधान केला जातो. महिलांमध्ये या दागिन्याचा खूप क्रेझ पाहायला मिळते. ( 10 New Patterns Of Bajuband)
बाजूबंदाचे वेगवेगळे पॅटर्न्स तुम्हाला सोनाराच्या दुकानात उपलब्ध होतील. तुम्ही आर्टिफिशियल किंवा 1 ग्रॅम गोल्डमध्येही बाजूबंद घेऊ शकता.
नऊवारी किंवा साहावारी काठाच्या साडीवर बाजूबंद शोभून दिसते. या दागिन्याचा इतिहासही राजेशाही आहे.
पूर्वीच्या राजघराण्यातील महिला आपल्या अलंकरांमध्ये बाजूबंदांचा समावेश करत होत्या.
तुम्ही आपल्या दंडाच्या आकारानुसार बाजूबंद बनवून घेऊ शकता किंवा अडजस्टेबल बाजूबंदही मिळतील.
या दागिन्यावर तुम्ही कुहिरी, मोर, फुल, असे वेगवेगळे डिजाईन्स बनवून घेऊ शकता. याशिवाय याला लटकन किंवा घुंगरूही लावू शकता.
सणवाराला तुम्ही या प्रकारचे बाजूबंद दंडांवर घालू शकता.
बाजूबंदांवर तुम्ही लाल किंवा गुलाबी स्टोन्स लावू घेऊ शकता.
जर तुम्हाला फार जाड डिजाईन आवडत नसेल तर बारीक डिजाईनची निवड करा.
(Image Credit- Social Media)