भारीच! प्रजासत्ताक दिन करा स्पेशल; 'हे' चविष्ट पदार्थ पाहून चिमुकल्यांसह मोठ्यांनाही होईल आनंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 15:50 IST2025-01-24T15:43:23+5:302025-01-24T15:50:47+5:30
घराच्या घरी पदार्थ झटपट बनवू शकता आणि मुलांना टिफिनमध्ये देखील देऊ शकता. फक्त लहान मुलंच नाहीत तर मोठेही खूश होतील

देशभरात प्रजासत्ताक दिन साजरा करण्याची तयारी जोरदार सुरू आहे. २६ जानेवारी हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा दिवस आहे. अशा परिस्थितीत, तुम्ही तुमच्या नेहमीच्या खाद्यपदार्थांना देशभक्तीशी देखील जोडू शकता.
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने अशा सोप्या आणि चविष्ट पदार्थांबद्दल सांगत आहोत, जे तुम्ही घराच्या घरी झटपट बनवू शकता आणि मुलांना टिफिनमध्ये देखील देऊ शकता. फक्त लहान मुलंच नाहीत तर मोठेही खूश होतील.
पोहे
पोहे हा एक अतिशय चविष्ट महाराष्ट्रीयन पदार्थ आहे, जो नाश्त्यात खूप लोकप्रिय आहे. पोहे घरी अगदी सहज बनवता येतात, हिरव्या रंगासाठी पालक वापरावा लागेल, तर गाजर वापरल्यामुळे केशरी रंग येईल.
ढोकळा
ढोकळा लहान मुलांना तसेच मोठ्यांनाही आवडतो. मुलांना तुम्ही टिफिनमध्येही ढोकळा देऊ शकता.
ढोकळ्यात रंगासाठी केशराचं पाणी आणि पालक प्युरीचा वापर करता येतो.
सँडविच
सँडविच बनवण्यासाठी सर्वात सोपं तर आहेच, पण ते टिफिनमध्येही नेता येतं. अशा वेळी तीन रंगामध्ये सँडविच तयार केल्यावर ते आणखी सुंदर दिसतं.
हिरवी चटणी, गाजर आणि व्हाईट ब्रेडपासून बनवलेलं सँडविच चवीला देखील मस्त लागतं.
पुलाव
हिवाळ्यात गरमागरम पुलाव खायला अनेकांना आवडतो. अशा परिस्थितीत, तुम्ही २६ जानेवारी रोजी पुलाव देखील तयार करू शकता आणि कुटुंबीयांसोबत याचा आनंद घेऊ शकता.
तुम्ही हिरव्या रंगासाठी हिरवी चटणी आणि केशरी रंगासाठी टोमॅटो प्युरी वापरू शकता. तसेच गाजर, मटार, फरसबी, फ्लॉवर वापरून देखील स्वादिष्ट पुलाव तयार करता येतो.
पास्ता
लहान मुलांना पास्ता खायला प्रचंड आवडतो. पास्तामध्ये विविध प्रकारच्या भाज्या देखील वापरता येतात, ज्यामुळे तो पौष्टिक होतो.
ब्रोकोली, गाजर, चीज वापरून तुम्ही उत्तम पास्ता बनवू शकता. प्रजासत्ताक दिनानिमित्त ही रेसिपी नक्कीच लक्षात राहिल.
इडली
इडली हा पौष्टिक नाश्ता आहे. अनेकांना इडली खायला आवडते. रंगीबेरंगी इडली लहान मुलं देखील आनंदाने शाळेत नेऊ शकतात.
इडलीमध्ये हिरव्या रंगासाठी पालक प्यूरी आणि केशरी रंगासाठी गाजराच्या प्यूरीचा वापर करू शकता.