बीटरूटचा रस पिण्याचे ६ फायदे! आठवडाभर पिऊन पाहा आणि स्वत:च कित्येक चांगले बदल अनुभवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2025 09:15 IST2025-09-19T09:14:33+5:302025-09-19T09:15:01+5:30

बीटरूटचा ज्यूस पिणे खूप आरोग्यदायी आहे. जर तुम्ही ८ दिवस नियमितपणे बीटरूटचा ज्यूस प्यायला तर त्याचा तुमच्या आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो ते बघूया..
बीटरूटचा रस नियमित प्यायलास दिवसभर खूप एनर्जेटिक वाटतं. अंगातला थकवा, आळस कमी होतो.
बऱ्याच जणींना रात्री झोपताना पायात पोटऱ्यांमध्ये गोळे येतात. हा त्रासही बीटरूटचा ज्यूस प्यायल्याने कमी होतो.
बीटरूटचा ज्यूस नियमितपणे प्यायल्यास त्याचा खूप चांगला परिणाम त्वचेवर दिसून येतो. त्वचा अधिक चमकदार होते.
बीटरूटचा ज्यूस प्यायल्याने शरीराला भरपूर प्रमाणात ऑक्सिजन मिळते. त्यामुळे शांत झोप लागण्यासही मदत होते.
बीटरूटमध्ये असणारे काही घटक आपला मेंदू अधिक जागृत करतात आणि त्यामुळे एकाग्रताही वाढते.
बॉडी डिटॉक्स होण्यासही बीटरूटचा रस मदत करतो. त्यामुळे चयापचय क्रिया, पचनक्रिया अधिक चांगली होऊन शरीर हलकं झाल्यासारखं वाटतं.