शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

संजू सॅमसनला साथ देणाऱ्या चारुलथाची गोष्ट, पडत्या काळात सावरलेली एक अनोखी लव्हस्टोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2026 18:25 IST

1 / 5
२०२६ च्या वर्ल्ड कप सामन्यात संजूची खेळी गेमचेंजर ठरली. स्फोटक आणि आत्मविश्वासपूर्ण खेळी करत चाहत्यांची मने जिंकली. सुरुवातीपासून आक्रमक फलंदाजी करत त्याने संघाला विजयरेखा पार करवली. आणि त्याच्या यशासोबत अजून एक नाव चर्चेत आलं.. त्याच्या बायकोचं!
2 / 5
चारुलथा तिचं नाव. त्यानं जसा डाव सावरला तशी तिनं त्याच्या जगण्याची आणि संसाराची इनिंग सावरली. सामन्यानंतर तिने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये एक भावनिक संदेश शेअर केला होता. 'Blessed & forever grateful to call this MAN ‘Mine’.'
3 / 5
चारुलथा मुळची केरळमधील असून ती एक केमिस्ट आहे. ह्युमन रिसोर्स क्षेत्रात कार्यरत आहे. प्रसिद्धीपासून थोडं दूर राहणारी चारुलथा साधेपणाने आयुष्य जगते. संजूच्या कारकिर्दीत त्याला कायम पाठिंबा देत आली आहे. संजूला अनेक सामने खेळायला मिळाले नाहीत. मात्र तरी त्याने धीर सोडला नाही. त्याची पत्नी कायम त्याच्या सोबत होती.
4 / 5
संजू आणि चारुलथा यांची प्रेमकहाणीही तितकीच खास आहे. दोघांची ओळख कॉलेजमध्ये झाली. मैत्रीपासून सुरू झालेला प्रवास हळूहळू प्रेमात बदलला. अनेक वर्षांच्या नात्यानंतर त्यांनी कुटुंबाच्या संमतीने लग्न केले. त्यांच्या नात्यात प्रसिद्धीपेक्षा विश्वास, समजूतदारपणा आणि परस्परांचा आदर अधिक महत्त्वाचा आहे.
5 / 5
संजूच्या बॅडपॅचमध्ये ती त्याच्यासोबत होती, तिनं त्याला हरु दिलं नाही. मॅचनंतर त्यानं तिला केलेला फोनकॉल आणि त्यापूर्वी एका मॅचमध्ये संजूसाठी प्रार्थना करत स्टेडियममध्ये बसलेली चारुलथा यांचे फोटो व्हिडिओ व्हायरल होत आहेतच.
टॅग्स :Sanju Samsonसंजू सॅमसनSocial Viralसोशल व्हायरलT20 Cricketटी-20 क्रिकेटT20 World Cupट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६Social Mediaसोशल मीडिया