शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

शरीरात प्रोटीनची कमतरता सांगणारी ८ लक्षणं; मसल्स कमकुवत होण्याआधी प्रोटीन फूड खा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 13:37 IST

1 / 9
शरीरात प्रथिनांची कमतरता असल्यास शरीर आपल्याला काही विशिष्ट संकेत देऊ लागते. प्रोटीन हे आपल्या शरीराचा बिल्डींग ब्लॉक आहे. (8 Symptoms That Indicate Protein Deficiency in The Body)
2 / 9
प्रोटीनमुळे पोट भरल्यासारखं वाटतं. जर आहारात प्रोटीन कमी असेल तर तुम्हाला वारंवार भूक लागते. (8 Signs You Are Not Get enough protein)
3 / 9
शरीराला पुरेसं प्रोटीन मिळालं नाही तर शरीर हाडांमधून आणि स्नायूंमधून प्रोटीन घेऊ लागते. यामुळे स्नायू कमी होतात आणि सांध्यांमध्ये अशक्तपणा जाणवतो.
4 / 9
आपले केस, त्वचा आणि नखं प्रामुख्यानं प्रोटीननं तयार झालेली असता. प्रोटीनच्या कमतरतेमुळे केस गळणं, नखं ठिसूळ होणं, त्वचा कोरडी पडणं अशी लक्षणं दिसून येतात.
5 / 9
दिवसभर काम करण्यासाठी लागणारी ऊर्जा आणि रक्तातील हिमोग्लोबिन टिकवून ठेवण्यासाठी प्रोटीनची आवश्यकता असते. त्याच्या अभावामुळे थोडं काम केल्यावरही थकवा येतो.
6 / 9
शरीरातील उतींची दुरूस्ती करण्यासाठी प्रोटीनची गरज असते जर तुम्हाला लागलेली जखम भरण्यास नेहमीपेक्षा जास्त वेळ लागत असेल तर प्रोटीनची कमतरता असू शकते.
7 / 9
आपली रोगप्रतिकारकशक्ती यंत्रणा मजबूत ठेवण्यासाठी एंटीबॉडीची गरज असतेच ज्या प्रोटीनपासून तयार होतात. प्रोटीन कमी असल्यास तुम्ही आजारी पडू शकता.
8 / 9
रक्तातील अल्ब्युमिन नावाच्या प्रोटीनच्या कमतरतेमुळे शरीरातील पेशींमध्ये पाणी साचू लागते. यामुळे प्रामुख्यानं पायांवर, घोट्यांवर आणि हातांवर सूज येते.
9 / 9
मेंदूतील न्युरोट्रान्समिटर्सच्या कार्यासाठी प्रोटीन्स आवश्यक असते. त्याच्या कमतरतेमुळे चिडचिड होते, कामात लक्ष न लागणं किंवा मानसिक थकवा जाणवू शकतो.
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यLifestyleलाइफस्टाइल