थंडीत हाडांच्या बळकटीसाठी खायलाच हवीत ८ फळं, मिळेल भरपूर कॅल्शियम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2023 02:55 PM2023-12-20T14:55:02+5:302023-12-20T15:25:57+5:30

8 Calcium rich fruits for good bone health

फळं आरोग्यासाठी चांगली असतात हे आपल्याला माहित आहे,पण हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक असणारा कॅल्शियमही फळांमधून मोठ्या प्रमाणात मिळतो.

एका १०० ग्रॅम संत्र्यामध्ये साधारण ४५ ते ५० ग्रॅम कॅल्शियम असते. याशिवाय फायबर आणि अँटीऑक्सिडंटसही चांगल्या प्रमाणात असतात.

ड्राय अंजीर हे थंडीच्या दिवसांत आवर्जून खायला हवे, १०० ग्रॅम सुक्या अंजीरातून १६० ग्रॅम कॅल्शियम मिळते.

किवीमध्येही कॅल्शियमसोबतच जीवनसत्त्वे आणि इतर उपयुक्त घटक असल्याने आरोग्यासाठी फायदेशीर असते.

पपई हे फळ अनेक जण टाळतात पण पपई हाही कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत आहे.

लिंबू हे सी व्हिटॅमिनसाठी अतिशय उपयुक्त फळ असून कॅल्शियमसाठीही ते फायदेशीर असते.

तुती हे बेरीज प्रकारात मोडणारे फळ असून एक कप तुतीमध्ये ५५ ग्रॅम कॅल्शियम असते.

आलूबुखार हे आपल्याकडे गेल्या काही वर्षात मिळणारे फळही कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत आहे.