एकच साडी पुन्हा पुन्हा नेसली तरी लूक दिसेल आकर्षक वेगळा! ७ टिप्स - साडी एकच - स्टायलिंग अनेक...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2025 15:05 IST2025-09-26T17:13:19+5:302025-09-27T15:05:49+5:30

7 styling tips to give old saree new look : how to reuse old saree with new style : saree restyling hacks for modern look : old saree makeover ideas at home : simple ways to style old saree differently : fashion tips to repeat saree with new twist : "एकच साडी पुन्हा नेसली तर कशी दिसेल?" असा प्रश्न पडला असेल तर, पाहा 'या' ७ खास स्टायलिंग टिप्स...

आपल्यापैकी प्रत्येकीच्या वॉर्डरोबमध्ये अनेक पॅटर्नच्या सुंदर साड्या असतात, पण एकदा (7 styling tips to give old saree new look) समारंभात नेसलेली साडी पुन्हा कोणत्या फंक्शनला नेसायची, असा प्रश्न अनेकदा पडतो. कारण ती साडी पुन्हा रिपीट (fashion tips to repeat saree with new twist) कशी करावी असा प्रश्न अनेकींना पडतो.

महागड्या किंवा आवडत्या खास ठेवणीतील साड्या आपण अनेकदा खास (simple ways to style old saree differently) प्रसंगीच नेसतो, पण त्या वारंवार रिपीट कराव्या लागल्या की कंटाळा येतो. "एकच साडी पुन्हा नेसली तर कशी दिसेल?" असा प्रश्न प्रत्येकीच्या मनात येतो. पण काळजी करू नका! कारण काही स्मार्ट स्टायलिंग टिप्स वापरून आपण तीच साडी वारंवार नेसूनही प्रत्येकवेळी वेगळा आणि नवीन लूक करता येऊ शकतो.

साडी नेसून त्यावर सुंदर असा डिझायनर बेल्ट घातला की, मॉडर्न आणि एथनिक लूक तयार होतो. बेल्टमुळे आपल्याला साडीत स्लिम लूक देखील मिळतो. पारंपरिक साडीवर लेदर किंवा फॅब्रिकचा बेल्ट लावा. हा बेल्ट साडीचा पदर व्यवस्थित ठेवण्यास मदत करतो आणि तुम्हाला एक आकर्षक लूक मिळतो.

साडीवर नेहमीचा तोच मॅचिंग ब्लाऊज घालण्यापेक्षा आपण क्रॉप टॉप घालून देखील स्टायलिंग करु शकता. यातही बोट नेक, सॉलिड नेक, हाय नेक अशा वेगवेगळ्या पॅटर्नचे क्रॉप टॉप पेअरिंग केले तर साडीला नवीन लूक मिळतो.

एखादी जुनी साडी कळून न येता रिपीट करायची असेल किंवा साध्या साडीलाही अधिक सुंदर व आकर्षक लूक द्यायचा असेल तर साडीवर श्रग किंवा लॉन्ग कोट घाला. यामुळे तुमचा लूक ग्लॅमरस दिसेल.

एकच साडी वेगळ्या पद्धतीने नेसल्यास आपला लूक पूर्णपणे नवीन दिसतो. नेहमीच्या साडी नेसण्याच्या स्टाईलऐवजी पँट-स्टाईल ड्रेप किंवा लहंगा-स्टाईल ड्रेप किंवा आणखीन इतर वेगवेगळ्या प्रकारे आपण साडी ड्रेप केल्याने साडीला नवीन लूक येतो.

साडीवर कॉन्ट्रास्ट रंगाचा किंवा वेगळ्या फॅब्रिकचा दुपट्टा किंवा शाल पेअरिंग करु शकता. जसे की, सिल्कच्या साडीवर नेटचा किंवा ब्रोकेडचा दुपट्टा एका खांद्यावर पिनअप करा. हा दुपट्टा लेअरिंगचा पर्याय साडीला नवा लुक देतो.

साडी रिपीट करताना सर्वात सोपा आणि मोठा बदल म्हणजे ब्लाऊज बदलणे. साडीच्या रंगाशी कॉन्ट्रास्ट होणारा किंवा अगदी वेगळा डिझायनर ब्लाऊज घाला. जसे की, सिल्कच्या साडीवर एम्ब्रॉयडरी असलेला हाय-नेक ब्लाऊज किंवा प्लेन साडीवर हेवी डिझाइनचा ब्लाऊज घाला. वेगवेगळ्या नेक पॅटर्नचे ब्लाऊज स्टाईल केल्यास (उदा. हॉल्टर नेक, फुल स्लीव्ह) संपूर्ण लुक बदलतो.

साडीवरील दागिने आणि एक्सेसरीज बदलून आपण साडीला नवीन फील देऊ शकतो. एकदा साडीवर हेवी नेकलेस घातला असेल, तर दुसऱ्यांदा फक्त स्टेटमेंट इअररिंग्स घाला. पारंपरिक दागिन्यांऐवजी ऑक्सिडाइज्ड किंवा वेस्टर्न दागिने वापरा. बॅग आणि शूजचा रंग किंवा प्रकार बदलूनही फरक पडतो.