मुलांनी हट्ट केला की एक सणकन ठेवून देता? ७ कारणं, हात उचलूच नका-तुम्हाला राग येतो कसला..

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 16:51 IST2026-03-17T15:03:42+5:302026-03-18T16:51:09+5:30

Negative Impact OF Physical Punishment Of Children (7 Reasons OF Nay No to Physical Disipline) : शिस्त लावण्यासाठी मारहाणीपेक्षा संवाद आणि प्रेमाचा आधार घेणं केव्हाही चांगलं मारल्यामुळे मुलं सुधारण्याऐवजी अधिक बंडखोर होतात

एकदा, दोनदा सांगून ऐकलं नाही तर बरेचजण मुलांवर हात उचलतात. त्यांना शारिरिक शिक्षा देणं. त्यांच्या वाढीवर अत्यंत नकारात्मक परिणाम करते. (The Negative Impact OF Physical Punishment Of Children)

मुलांना मारल्यामुळे त्यांच्या मनात भिती निर्माण होते. ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमी होतो. (Parenting Tips)

जी मुलं सतत मार खातात ती पुढे जाऊन अधिक हट्टी किंवा हिंसक बनवण्याची शक्यता असते.

पालकांनी हात उचलल्यामुळे मुलांच्या मनात त्यांच्याबद्दलचा आदर कमी होऊन भिती आणि राग निर्माण होतो. ज्यामुळे नात्यात दुरावा येतो.

चुकांवरून मार मिळाल्यास मुलं नवीन गोष्टी शिकायला घाबरतात आणि चुका लपवण्यासाठी खोटं बोलतात.

मारल्यामुळे मुलांना आपण सुरक्षित नाही आहोत असं वाटू शकतं. ज्याचा परिणाम त्यांच्या मानसिक आरोग्यावरच होतो.

समस्या सोडवण्यासाठी हिंसा हाच मार्ग आहे असा चुकीचा संदेश मुलांपर्यंत पोहोचतो.

शिस्त लावण्यासाठी मारहाणीपेक्षा संवाद आणि प्रेमाचा आधार घेणं केव्हाही चांगलं मारल्यामुळे मुलं सुधारण्याऐवजी अधिक बंडखोर होतात