ताकाची कढी करण्याच्या ७ टिप्स, कढी फुटणार नाही-तोंडाला येईल चव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 14:15 IST2026-04-06T08:22:00+5:302026-04-06T14:15:29+5:30

7 Pro Tips To Make Kadhi : कढीला चांगली उकळी आल्यानंतर सर्वात शेवटी मीठ घाला. सुरूवातीला मीठ घातल्यास कढी फुटण्याची शक्यता असते.

ताकाची कढी चविष्ट आणि न फाटता होण्यासाठी काही टिप्स लक्षात ठेवाव्या लागतील. कढीसाठी ताक खूपच जास्त आंबट किंवा खूप गळचट नसावे. ताक मध्यम आंबट असल्यास कढीची चव छान लागते. (How To Make Kadhi From Buttermilk)

ताकामध्ये बेसन घालताना ते व्यवस्थित गुठळ्या न होऊ देता मिसळून घ्या.साधारणपणे १ लिटर ताकासाठी २ ते ३ मोठे चमचे इतकं बेसन पुरेसं असतं.

कढी गॅसवर ठेवल्यापासून त्याला पहिली उकळी येईपर्यंत पळीनं सतत ढवळत राहा. यामुळे कढी फुटत नाही.

कढीला खरी चव आलं, लसूण आणि हिरव्या मिरचीच्या ताज्या वाटणामुळे येते. हे वाटण तेलात किंवा तुपात व्यवस्थित परतवून घ्या.

चवीचा समतोल राखण्यासाठी कढीमध्ये थोडी साखर किंवा गूळ नक्की घाला. ज्यामुळे आंबटपणा संतुलित होतो.

कढीला चांगली उकळी आल्यानंतर सर्वात शेवटी मीठ घाला. सुरूवातीला मीठ घातल्यास कढी फुटण्याची शक्यता असते.

कढीला नेहमी साजूक तुपाची फोडणी द्यावी. ज्यात जिरं, मोहोरी, हिंग,कढीपत्ता आणि लवंग, दालचिनी घातल्यास कढीला छान सुवास येतो.