पार्लरचा खर्च वाचवणाऱ्या ७ घरगुती युक्त्या; ग्लोईंग दिसेल चेहरा, केसही चमकदार होतील....
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 20:47 IST2026-03-23T20:18:36+5:302026-03-23T20:47:32+5:30
7 Budget Friendly Beauty Hacks To Save Saloon Money : मेनिक्युअरचा खर्च वाचवण्यासाठी लिंबाचा रस काढल्यानंतर त्याची सालं नखांवर घासल्यानं नखांचा पिवळेपणा दूर होतो आणि नखं चमकू लागतात.

महागड्या पार्लर ट्रिटमेंटवर हजारो रुपये खर्च करण्यापेक्षा स्वयंपाकघरातील काही नैसर्गिक गोष्टी वापरून तुम्ही घरच्याघरी पार्लरसारखा ग्लो मिळवू शकता. तुमचे पैसे वाचवणारे ६ सोपे ब्युटी हॅक्स पाहूया. (Natural Beaty Secrets To Save Your Money)

घरगुती फेस क्लिनअप
पार्लरमध्ये जाऊन महागडे फेशियल करण्याऐवजी मध आणि लिंबाचा रस एकत्र करून चेहऱ्यावर लाव. मध त्वचेला मॉईश्चराईझ करण्यास मदत करेल. (7 Budget Friendly Beauty Hacks To Save Saloon Money)

स्वस्त आणि मस्त स्क्रब
बाजारातील महागड्या स्क्रबपेक्षा कॉफी पावडर आणि खोबरेल तेल एकत्र करून स्क्रब तयार करा. हे मिश्रण चेहऱ्यावरील आणि शरीरावरील डेड स्किन सेल्स काढून टाकण्यास मदत करते आणि त्वचा मऊ करते.

टी बॅग्सचा वापर
डोळ्यांखालील काळी वर्तुळं काढून टाकण्यासाठी आय-क्रिमवर खर्च करण्याची गरच नाही. वापरलेल्या ग्रीन टी बॅग्स थंड करून डोळ्यांवर १० ते १५ मिनिटांसाठी ठेवा. यातील कॅफेनमुळे सूज आणि काळी वर्तुळ कमी होतील.

नैसर्गिक हेअर स्पा
केसांना चमक आणण्यासाठी पार्लरमध्ये हेअर स्पा करण्याऐवजी दही आणि कोरफड जेल एकत्र करून केसांनालावा. अर्ध्या तासानंतर केस धुवा. यामुळे केस रेशमी होतात आणि कोंड्याची समस्याही कमी होते.

ओठांसाठी घरगुती लिप स्क्रब
ओठ गुलाबी आणि मऊ ठेवण्यासाठी साखर आणि मध एकत्र करून ओठांवर हलक्या हाताने चोळ. यामुळे ओठांवरील काळेपणा निघून जातो आणि ओठ नैसर्गिकरित्या मऊ होतात.

नखांची काळजी
मेनिक्युअरचा खर्च वाचवण्यासाठी लिंबाचा रस काढल्यानंतर त्याची सालं नखांवर घासल्यानं नखांचा पिवळेपणा दूर होतो आणि नखं चमकू लागतात.

नैसर्गिक स्किन टोनर
पार्लरमध्ये महागडे टोनर वापरण्याऐवजी काकडीचा रस आणि गुलाब पाणी एकत्र करून एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा. यामुळे चेहऱ्यावरील उघडी छिद्र बंद होतात आणि त्वचा दिवसभर हायड्रेट राहते.

















