प्रत्येक आईनं ऐश्वर्याकडून शिकाव्या 'या' ५ आदर्श पालकत्वाच्या सवयी; गुणी-समंजस होतील मुलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 16:27 IST2026-03-30T16:09:42+5:302026-03-30T16:27:43+5:30
5 Simple Yet Powerful Parenting Lessons Aishwarya Rai Bacchan : प्रसिद्धीच्या वलयात असूनही ऐश्वर्यानं आराध्याचे बालपण सामान्य ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.

जागतिक स्तरावर प्रसिद्धी मिळाल्यानंतरही ऐश्वर्या राय बच्चनने (Aishwarya Rai Bacchan) आपल्या मुलीचा म्हणजेच आराध्याचा सांभाळ ज्या पद्धतीन केला आहे. ते अनेक पालकांसाठी प्रेरणादायी ठरते. तिच्या पालकत्व कौशल्यातून प्रत्येक पालकानं शिकावेत असे ५ गुण पाहूया. ( 5 Simple Yet Powerful Parenting Lessons Aishwarya Rai Bacchan Shows Through Actions)

शब्दांपेक्षा कृतीला महत्व
मुलं पालकांचे ऐकण्यापेक्षा त्यांच्या वागण्याचे अनुकरण जास्त करतात. ऐश्वर्या जिथे कुठे जाते तिथे तिचे वागणे अत्यंत शिस्तबद्ध, संयमी आणि आदराचे असते. आराध्याला केवळ शिस्त शिकवण्यापेक्षा ऐश्वर्या तसं वागून तिच्या समोर एक आदर्श ठेवते.

वेळेला प्राधान्य
ऐश्वर्यानं आराध्याच्या जन्मानंतर आपल्या करीयरमध्ये मोठे बदल केले. तिनं अने मोठे प्रोजेक्टस नाकारले किंवा कामाचे वेळापत्रक आराध्याच्या सोयीनुसार ठरवले.मुलांसाठी पालकांचा वेळ ही सर्वात मौल्यवान गोष्ट आहे.

मुलांमधील आत्मविश्वास आणि स्वतंत्र ओळख
आराध्या अनेकदा सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये किंवा शाळेच्या स्नेहसंमेलनांमध्ये आत्मविश्वासानं वावरताना दिसते. ऐश्वर्या तिला नेहमीच पाठिंबा देत तिची आवड जोपासायला प्रोत्साहन देते. मुलावर कोणत्याही अपेक्षांचे ओझे न घालता ओळख निर्माण करू देणं हा महत्वाचा धडा आहे.

कौटुंबिक मुल्यांची जपणूक
ऐश्वर्या आराध्याला भारतीय संस्कृती आणि कौटुंबिक मुल्यांशी जोडून ठेवते. मण ते सण-उत्सव असो किंवा मोठ्यांचा आशीर्वाद असतो आराध्या नेहमीच मुळांशी जोडलेली दिसते.

सुरक्षित आणि पोषक वातावरण देणं
प्रसिद्धीच्या वलयात असूनही ऐश्वर्यानं आराध्याचे बालपण सामान्य ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. तिला ग्लॅमरपासून दूर ठेवून सुरक्षित आणि प्रेमळ वातावरणात वाढवणं जेणेकरून तिचे पाय जमिनीवर राहतील. याकडे ऐश्वर्याचे विशेष लक्ष असते.

















