दुतोंडी लोकांची १० लक्षणं; तोंडांवर गोड बोलतात आणि मागे कागाळ्या करतात..
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 12:42 IST2026-03-22T15:25:32+5:302026-03-23T12:42:40+5:30
10 Signs Of Double Faces People : तुमच्या दु:खात सहभागी असल्याचा खोटा देखावा करून हे लोक तुमच्या खासगी गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करतात.

समाजात वावरताना आपल्याला अनेकदा दुतोंड्या प्रवृत्तीची माणसं भेटतात. अशा लोकांपासून सावध राहण्यासाठी काही प्रमुख लक्षणं समजून घ्या. (How To Know If Person is Two Faced)

हे लोक तुमच्या तोंडावर तुमचं खूपच कौतुक करतात पण तुम्ही पाठ फिरवली की लगेच इतरांकडे तुमच्याबद्दल उणेदुणे बोलतात. (10 Signs Of Double Faces People)

त्यांचे बोलणे अत्यंत साखरपेरणीसारखे असते. ज्यामुळे समोरच्या व्यक्तीला त्यांचा संशय येतच नाही.

एकाची गुपितं दुसऱ्याला सांगून स्वत:चा फायदा करून घेणे किंवा विनाकारण वाद लावणं ही यांची जुनी सवय असते.

ज्याच्याकडून काम करून घ्यायचे आहे . त्याच्याशी हे लोक लगेच निष्ठा बदलतात.

स्वत:च्या चुकांचे खापर दुसऱ्यावर फोडणं त्यांना चांगलं जमतं. कठीण प्रसंगांत स्वत:ला वाचवण्यासाठी हे लोक कोणचाही बळी देऊ शकतात.

यांच्या वागण्यात आणि बोलण्यात प्रमाणिकपणाचा अभाव असतो. हे लोक सतत मुखवटे बदलत असतात.

तुमच्या दु:खात सहभागी असल्याचा खोटा देखावा करून हे लोक तुमच्या खासगी गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करतात.

दोन भांडणाऱ्या गटात हे लोक दोन्ही बाजूंनी मी तुमचाच आहे असं भासवतात. अशा लोकांवर ठेवलेला विश्वास नेहमीच महागात पडतो कारण ते कधीही दगा देऊ शकतात.

त्यांचे प्रत्येक नाते आणि व्यवहार हा केवळ स्वत:च्याच फायद्याभोवती फिरत असतो. अशा लोकांपासून अंतर ठेवणं हेच मानसिक शांततेसाठी उत्तम ठरते.

















