नवराबायकोला सतत एकमेकांचा राग का येतो? १० कारणं- घरात शांतता आणि नात्यात प्रेम वाढवण्याचा उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 15:05 IST2026-03-16T19:02:06+5:302026-03-17T15:05:56+5:30

10 Reasons Why Frequent Anger In Relationship : जोडीदाराकडून खूप जास्त अपेक्षा ठेवणं त्या पू्र्ण न होणं यामुळे चिडचिड होते.

नात्यामध्ये वारंवार राग येणं हे केवळ स्वभावामुळे नसते तर अनेक भावनिक आणि व्यावहारीक कारणं असू शकतात. नात्यात दुरावा निर्माण होण्यापूर्वी कारणं समजून घ्यायला हवं.(10 Reasons Why Frequent Anger In Relationship)

जेव्हा तुम्ही मनातल्या गोष्टी स्पष्टपणे जोडीदाराला सांगू शकत नाही तेव्हा ती घुसमट रागाच्या स्वरूपात बाहेर येते. त्याला किंवा तिला न सांगता समजायला हवं ही अपेक्षा अनेकदा वादाचं कारण ठरते. (Whats Make You Angrey In Relationship)

जोडीदाराकडून खूप जास्त अपेक्षा ठेवणं त्या पू्र्ण न होणं यामुळे चिडचिड होते. प्रत्येकवेळी समोरची व्यक्ती तुमच्या मनासारखंच वागेल असं नाही.

भूतकाळातील चुका किंवा वाद वारंवार काढल्यामुळे मनात कडवटपणा राहतो. यामुळे सध्याच्या छोट्या गोष्टींवरही खूप मोठा राग येतो.

जर तुम्हाला वाटत असेल तर तुमचा जोडीदार तुमच्या मताची किंमत करत नाही किंवा इतरांसमोर तुमचा अपमान करतो तर मानत राग साचत जातो.

कामाच्या व्यापात किंवा इतर कारणांमुळे एकमेकांना पुरेसा वेळ न देणं यामुळे नात्यात दुर्लक्षित वाटू शकतं.

नात्यात विश्वास नसेल तर प्रत्येक गोष्टीत संशयानं पाहिलं जातं. यातून होणारी चौकशी आणि स्पष्टीकरण दोघांच्याही रागाला खतपाणी घालतात.

घरातील कामं किंवा आर्थीक जबाबदाऱ्या केवळ एकाच व्यक्तीवर पडत असतील तर त्या व्यक्तीला थकवा किंवा मानसिक ताण येतो जो रागाच्या स्वरूपात बाहेर येतो.

आपल्या जोडीदाराची तुलना दुसऱ्याच्या जोडीदाराशी किंवा नातेवाईकांशी केल्यामुळे व्यक्तीचा स्वाभिमान दुखावला जातो.

प्रत्येक व्यक्तीला स्वत:चा असा थोडा वेळ हवा असतो. जेव्हा जोडीदार खूप जास्त पझेसिव्ह असतो किंवा सतत सोबत राहण्याचा आग्रह धरतो तेव्हा नात्यावर त्याचा परिणाम होतो.