ब्लाऊजच्या मागच्या गळ्याच्या १० फॅन्सी डिजाईन्स; ऑर्गेन्झा-शिफॉन साड्यांसाठी तर एकदम सुंदर हॉट लूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 16:58 IST2025-11-17T13:04:07+5:302025-11-17T16:58:33+5:30
10 Fancy Designs for Back Neck of Blouse : स्टोन्सच्या साड्यांवर पफ स्लिव्हज किंवा बलून स्लिव्हज उठून दिसतात. तसंच कोणत्याही साडीवर हे ब्लाऊजेस उठून दिसतात.

आजकाल स्टोन्सची बॉर्डर असलेल्या साड्या बाजारात बऱ्याच दिसून येतात. स्टोन्सच्या साड्या तुम्हाला कोणत्याही फंक्शनसाठी किंवा पार्टीवेअरसाठी उत्तम पर्याय आहेत. स्टोन्सच्या साड्यांवर तुम्ही टिपिकल ब्लाऊज न शिवता डिझायनर ब्लाऊज शिवू शकता. (Latest Blouse Designs)

स्टोन्सच्या साड्यांवर शिवता येतील असे सुंदर ब्लाऊज डिजाईन्स पाहूया.या डिझाईन्स तुम्हाला खूपच आवडतील. पारंपारीक पद्धतीचे साधे गळे न शिवता तुम्ही तुमचा लूक खुलवू शकता. ( Trending Blouse Designs)

स्टोन्सच्या साड्यांवर पफ स्लिव्हज किंवा बलून स्लिव्हज उठून दिसतात. तसंच कोणत्याही साडीवर हे ब्लाऊजेस उठून दिसतात.

यात तुम्हाला मागच्या बाजूला रिबन लावणं, फुल शिवून घेणं,जाळीचे पॅटर्न, मागच्या बाजूला दोऱ्या असे बरेच पॅटर्न्स शिवू शकता.

ऑर्गेन्जा किंवा शिफॉन साड्यांवर असे ब्लाऊजेस तुम्ही शिवू शकता. यामुळे युनिक लूक मिळेल.

डीप व्ही नेक शिवून त्यावर पॅटर्न शिवणं हा सध्याचा खूपच ट्रेंडींग पॅटर्न आहे.

ब्लाऊज शिवून घेताना अनुभवी टेलरकडून शिवून घ्या. अन्यथा शिलाई बिघडण्याची शक्यता असते.

ब्लाऊजलाचा गळा मोठा न ठेवता त्याला नेट लावून घेणं ही फॅशनसुद्धा लेटेस्ट आहे. बऱ्याच सेलिब्रिटी अशा प्रकारचे ब्लाऊजेस शिवतात.

ब्लाऊजला मागच्या बाजूला बो लावणार असाल तर त्यावर गुलाबाचे फुल शिवून घ्या आणि वरच्या भागाला दोऱ्या किंवा नेटही लावता येईल.

मागच्या बाजूला छोटं हुक लावण्याची फॅशनसुद्धा आहे. मागच्या बाजूला एक छोटंस हूक लावल्यानं ब्लाऊज अधिक खुलून येईल.
















