मुलांना द्या स्ट्रेस मॅनेजमेंटच्या 'या' टिप्स; तणावापासून ठेवा दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 12:05 PM2019-09-18T12:05:53+5:302019-09-18T12:11:53+5:30

आजच्या धावपळीच्या आयुष्यात ताण-तणावाचा प्रत्येक जण सामना करत असतं. लहान मुलं देखील अनेकदा अभ्यासाचं टेन्शन घेतात. मुलांना स्ट्रेस फ्री कसं ठेवायचं हे जाणून घेऊया.

मुलांना खेळायला जास्त आवडत असल्याने अभ्यासाचा कंटाळा येतो. तर परीक्षेच्या वेळी टेन्शनमुळे त्याचं अभ्यासात लक्ष लागत नाही. त्यामुळे मुलांना योगा आणि व्यायाम शिकवा. मुलं यामुळे फिट आणि फाईन राहतील.

लहान मुलांमध्ये अनेक सुप्त गुण असतात. त्यांना वाव द्या. तसेच त्यांना त्यांचा छंद जोपासण्यासाठी मदत करा. आवडत असलेली गोष्ट करायला मिळाल्याने मुलं फ्रेश राहतात. तसेच त्यांचं माईंड देखील कूल राहतं.

रोजच्या रुटीनचा मुलांना वैताग आलेला असतो. त्यामुळे त्यांना काही दिवसांनंतर कॉमेडी फिल्म दाखवा. जेणेकरून मुलं आनंदी राहतील. तसेच त्यांच्या आवडीचं कार्टून पाहा. त्यांच्यासोबत खेळा.

मुलांशी मोकळेपणाने संवाद साधा. त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करा. तसेच महिन्यातून काही वेळा त्यांना बाग अथवा अन्य ठिकाणी फिरायला घेऊन जा. मुलांशी गप्पा मारल्यास पालक आणि मुलांचं नातं अधिक घट्ट होतं.

मुलांना अभ्यासक्रमात असलेली पुस्तकं वाचायला प्रचंड कंटाळा येतो. त्यामुळे त्यांना चांगल्या आशयाची गोष्टींची पुस्तक वाचायला द्या. मुलांना वाचनाची आवड लावा म्हणजे त्यांच्या ज्ञानात भर पडेल. तसेच वाचनातून प्रेरणा मिळते.

लहान मुलांकडून अनेकदा चूका होतात. त्यावेळी त्यांच्यावर न ओरडता त्यांना त्यांची चूक समजावून सांगा. एखादं चांगलं काम केल्यास प्रोत्साहन द्या. तसेच त्यांचं कौतुक करा. लहान मुलांना सरप्राईज आणि गिफ्ट्स आवडतात. त्यामुळे त्यांच्यासाठी काही खास प्लॅन करून त्यांना खूश करा.