शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

इंटरकल्चर रिलेशनशिपमधील समस्यांना 'या' सोप्या उपायांना करा हॅण्डल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2020 2:32 PM

1 / 10
सध्याच्या काळात अरेंज मॅरेजचं प्रमाण खूप कमी दिसून येतं. आपल्या मर्जीप्रमाणे जोडीदार निवडून लग्न करत असलेल्यांची संख्या वाढत आहे. जर कपल्स एकाच जातीचे किंवा धर्माचे असतील तर एडजस्ट व्हायला सोपं जातं. पण जर इंटरकल्चर असतील तर दोन्ही कुटुंबाना समजून घेण्यास त्रास होत असतो. अनेकदा दबावाचा सामना करावा लागतो. आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत. ज्या टिप्सचा वापर करून तुम्ही तुमचं इंटरकल्चरल रिलेशनशिप चांगल्या पध्दतीने मॅनेज करू शकता.
2 / 10
तुमच्या पार्टनरची संस्कृती त्यातील बारकावे शांतपणे समजून घ्यायला हवेत. तुमच्या पार्टनरच्या लहानपणीच्या आठवणींबदद्ल बोला, त्यांची वाढ कोणत्या वातावरणात झाली हे जाणून घ्या. म्हणजे चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकता.
3 / 10
प्रत्येक कुटुंबाचे नियम आणि परंपरा असतात. इंटरकल्चर मॅरेजमुळे या पंरपरा तुटू शकतात. कपल्सवर धार्मीक गोष्टी फॉलो करण्यासाठी कुटुंबियांकडून दबाव येत असतो. त्यामुळे आवडीने पार्टनरच्या आधीच्या परंपरा समजावून घ्या, आणि तिला तुमच्या घरातील परंपराबद्दल समजावून सांगा.
4 / 10
सुरूवातीच्या काळात तुम्हाला एकमेकांना समजून घ्यायला त्रास होईल. त्यासाठी एकमेकांच्या भाषा शिकण्याचा प्रयत्न करा. कारण संवादात असलेला दुरावा नात्यांमध्ये समस्या निर्माण करू शकतो. नातेवाईंकांना भेटा. त्यांना आपलंसं करा.
5 / 10
सुरूवातीला असं होऊ शकतं की तुम्ही संकंटांचा सामना करताना हताश आणि निराश व्हाल. पण सतत प्रयत्न केल्यानंतर तुम्ही तुमच्या पार्टनरला चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकता. कारण पार्टनरला लगेचचं तुमच्या घरातील गोष्टी येईल असं नाही सुरुवातीला चुका होण्याती शक्यता असते. त्यांना शिकायला वेळ सुद्धा लागू शकतो.
6 / 10
सगळ्यांच्या आयुष्यात एक स्वतःची हक्काची असणारी व्यक्ती येत असते. त्यामुळे तुम्ही रोजचे बेडरुल्स तयार करणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. त्यासाठी बेडरूममध्ये आल्यानंतर फोन साई़ड्ला ठेवून द्या. दिवसभराचे टेंशन आणि निगेटिव्हीटी संपूर्ण बेडरूमच्या बाहेर ठेवून मग पार्टनरला वेळ द्या.
7 / 10
पार्टनरला आणि पार्टनरच्या घरच्यांना सन्मान द्या.
8 / 10
जेव्हा तुम्ही इतर संस्कृतीच्या एखाद्या व्यक्तीसोबत लग्न करत असता त्यावेळी तुम्ही नकळतपणे एका अनोळखी जगात पाऊल ठेवत असता. अनेकदा तुम्हाला कल्पनाही नसते अशा नवीन गोष्टींचा सामना करावा लागतो. तेव्हा तुम्ही या बदलांचा स्वीकार करायला हवा.
9 / 10
पार्टनरच्या किंवा तिच्या घरच्यांच्या भावना दुखावल्या जातील असं काही बोलण्याआधी विचार करा.
10 / 10
पार्टनरच्या किंवा तिच्या घरच्यांच्या भावना दुखावल्या जातील असं काही बोलण्याआधी विचार करा.
टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिपrelationshipरिलेशनशिप