शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

फक्त मुलींनाच नाही, मुलांनाही शिकवा या आवश्यक गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2018 1:53 PM

1 / 6
1. स्वयंपाक घर केवळ मुलींसाठीच नसतं : बऱ्याचदा आई आपल्या मुलाला स्वयंपाक घरातील कोणतीही कामं करण्यास सांगत नाही. स्वयंपाक घरात केवळ मुलींचीच जाग असते, अशी बहुतांश कुटुंबीयांनी समज करुन घेतलेली असते. पण आताच काळ बदलला आहे. मुलांनाही स्वयंपाक घरातील कामं आली पाहिजेत. कारण काम, शिक्षणनिमित्त एकटं राहण्याची वेळ येऊ शकते. शिवाय, लग्नानंतरही पत्नीनं जॉब करण्याचा निर्णय घेतला तर स्वयंपाक घरात काम करण्याच्या सवयीचा फायदा होऊ शकतो.
2 / 6
2. थोडाफार तरी स्वयंपाक यावा : 12 वर्षांनंतर मुलं परिपक्व होऊ लागतात. यानंतर पालकांनी आपल्या मुलांना बेसिक कुकिंग म्हणजे चहा, सँडविच, वरण भात यांसारखे छोटे-मोठे पदार्थ बनवणे शिकवावे.
3 / 6
3. शारीरिक हिंसा करू नये : शारीरिक हिंसा वाईट असते, ती कधीच करू नये, यापासून आपल्या मुलांना दूर राहण्याचा सल्ला द्यावा. अहिंसेचे धडे दिल्यानं आपला मुलगा घराबाहेरही हाणामारी करण्यापासून दूर राहील शिवाय, घरातील सदस्यांवरही कधी हात उगारण्याचा प्रयत्न करणार नाही.
4 / 6
4. महिलांचा सन्मान करा : आपल्या मुलांना महिलांचा आदर करण्यास शिकवावे. मुलगा-मुलगी समान असतात, त्यांच्यात भेदभाव करू नये, मुली-महिलांसोबत आदराने बोलावे, हे त्यांना सांगावे. लहानपणापासून महिला सन्मानाचे बाळकडू दिल्यास आपले मुल मोठेपणीही महिलांचा योग्यरितीनं आदर करतील.
5 / 6
5. भावनात्मक व्हा : मुलं रडायला लागली की, काय रे मुलींसारखा रडतोस?, असे अनेकांना बोलायची सवय असते. पण असे विधान करणं नियमानं टाळा. भावनात्मक असणं ही काही शरमेची बाब नाही. वारंवार असे विधान करुन तुम्ही मुलांना कठोर बनवता आणि मग यामुळे मुलं कोणाच्याही भावना समजून घेत नाहीत.
6 / 6
6. दया भाव : प्रत्येकाबाबत मनात दया भाव असावी, असे मुलांना वारंवार सांगावे. क्रूर वागणं चांगलं नसते, यामुळे स्वतःचंच नुकसान होतं. प्रत्येक जिवावर प्रेम करणं आणि त्यांचा सन्मान करणं त्यांना शिकवावं.
टॅग्स :relationshipरिलेशनशिप