शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मुलांना लावा सेव्हिंग्सची सवय; आयुष्यभरासाठी होईल मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2019 3:10 PM

1 / 8
पालक मुलांवर उत्तम संस्कार करत असतात. लहान मुलं अनेकदा बाजारात नवनवीन वस्तू पाहतात. त्यांना त्या सर्व गोष्टी हव्या असतात. मात्र काही वस्तू या कधीकधी मुलांच्या उपयोगाच्या नसतात. त्यामुळे पालक त्या घेऊन देत नसल्याने मुलं नाराज होतात.
2 / 8
मुलांना बचत करायला शिकवा तसेच त्याची सवय लावा. लहानपणापासून बचतीचे महत्त्व पटवून द्या. म्हणजे सेव्हिंग्सचा मुलांना आयुष्यभरासाठी फायदा होईल.
3 / 8
मुलांना छानशी पिगी बँक गिफ्ट करा. त्यामध्ये त्यांना त्यांच्या खाऊची काही रक्कम साठवून ठेवायला सांगा.
4 / 8
पिगी बँकमध्ये साठवलेले पैसे गरज असल्यास कसे वापरू शकतो हे मुलांना पटवून द्या. तसेच त्यांना पैशाचं महत्त्व पटवून द्या.
5 / 8
बाजारात रंगीबेरंगी आणि आकर्षक पिगी बँक उपलब्ध आहेत.
6 / 8
लहान मुलांना बँकेत घेऊन जा. तसेच बँकेच्या कामकाजाची थोडी माहिती द्या.
7 / 8
मुलांना पैसे दिल्यास त्यांच्या खर्चावर लक्ष ठेवा.
8 / 8
मुलांना नोटा आणि नाणी यांच्यातील फरक सांगा आणि त्याबाबत माहिती द्या.
टॅग्स :Parenting Tipsपालकत्वbankबँकMONEYपैसा