पहिल्याच डेटला मुलीला 'हे' प्रश्न विचारुन होणारं काम बिघडवाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2018 03:11 PM2018-12-12T15:11:44+5:302018-12-12T15:29:58+5:30

जर तुम्ही कुणासोबत पहिल्यांदा डेटला जात असाल तर काही गोष्टींची काळजी घेणे तुमच्या फायद्याचं ठरेल. ही काळजी नाही घेतली तर उत्साहाच्या भरात तुमची ही पहिली डेट शेवटची ठरु शकते. अनेकदा डेटला काही चुकीचे प्रश्न विचारले जातात आणि या प्रश्नांमुळे होणारं कामही बिघडतं. चला जाणून घेऊ काही असेच काही प्रश्न. (Image Credit : thehkhub.com)

या नात्याचं भविष्य काय आहे? - तुला या नात्याबाबत काय वाटतं? किंवा या नात्याचं फ्यूचर काय? असे प्रश्न पहिल्याच डेटला विचारणं तुम्हाला अडचणीत टाकू शकतं. डेटला तर लोक एकमेकांना जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतात, अशा रिलेशनशिपच्या भविष्याबाबत विचारणे जरा विचित्र होईल. (Image Credit : www.huffingtonpost.com)

भूतकाळातील रिलेशनबाबत - असे म्हणतात ना की, भूतकाळाला भूतकाळच राहू द्यावा. ही बाब रिलेशनशिप आणि डेटिंगसाठीही लागू पडते. जर तुम्ही कुणाला पसंत करत असाल तर त्या व्यक्तीला आधीच्या रिलेशनशिपबाबत विचारणा करणे चुकीचं ठरेल. (Image Credit : www.huffpost.com)

तुला मुलं हवी आहेत? - जी मुलगी अजून तुम्हाला चांगल्याप्रकारे ओळखत नाही. तुमचं हे नातं पुढे टिकेल की नाही हे माहीत नाही. अशात तिला थेट मुलांबाबत विचारणे हे जरा फारच अवघड काम होईल.

सेक्शुअल फॅंटसी - तुम्ही जर दुसरं काही न विचारता हा प्रश्न विचारला, अशात मुलीला अचानक फोन कॉल आला आणि ती उठून बाहेर गेली तर ती पुन्हा परत येण्याची अपेक्षा सोडून द्या. बरं इतकंच नाही तर तिचा फोन किंवा मेसेज येण्याची वाट पाहण्यातही काही अर्थ नाही.

पगार किती मिळतो? - हा प्रश्न विचारल्यावर जर मुलीच्या मनात प्रतिप्रश्न उपस्थित झाला की, काय तू पैशांसाठी डेट करतोय? तर तुमचं काम बिघडू शकतं. एकदा जर असं काही तिच्या मनात बसलं तर मग हे नातं पुढे जाणं अशक्य आहे समजा.

तू फेमिनिस्ट आहे? - हा प्रश्न विचारुन तुम्ही भांडणासाठी तयारच रहायला हवं. फेमिनिझमच्या आधारावर जर तुम्ही मुलीबाबत काही विचार करत असाल तर मग ही डेटची आयडिया डोक्यातून काढलेलीच बरी. (Image Credit : www.girlschase.com)