कार्टून पाहण्याचे 'हे' फायदे माहीत आहे का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2020 13:14 IST2020-02-08T13:01:21+5:302020-02-08T13:14:15+5:30

लहान मुलांना कार्टून पाहायला प्रचंड आवडतं. मात्र अनेकदा पालक मुलांना कार्टून पाहण्यापासून रोखतात.
लहान मुलांच्या मनावर त्याचा विपरित परिणाम होऊ नये यासाठी ते मुलांना कार्टूनपासून लांब ठेवतात. मात्र कार्टून पाहण्याचे अनेक फायदे असून ते मुलांच्या वाढीसाठी उपयुक्त असतात.
शब्द संख्या वाढवतं
लहान मुलं कार्टून पाहताना ते टक लावून पाहतात. त्यातील काही संवादही त्यांचे तोंडपाठ असतात. मात्र अनेकदा कार्टूनमध्ये विविध शब्द वापरले जात असतात. यामुळे मुलांना नवीन शब्दांची ओळख होते. तसेच त्यांची शब्दसंख्या वाढण्यास मदत होते.
कल्पकतेला चालना
कार्टूनमध्ये कल्पकतेचा वापर हा केला जातो. अनेकदा काल्पनिक प्रसंग त्यामध्ये दाखवण्यात आलेले असतात. यामुळे मुलांच्या कल्पकतेला चालना मिळते.
चांगल्या सवयी
अनेक कार्टूनमधून मुलांना चांगला संदेश दिला जातो. नेहमी खरं बोलावं, एखाद्या व्यक्तीची मदत करावी अशा अनेक गोष्टी या कार्टूनच्या माध्यमातून मुलांना शिकता येतात.
मिळून-मिसळून राहणं
काही मुलं एकटीचं असतात. त्यामुळे ते लवकर इतरांमध्ये मिसळत नाहीत. मात्र कार्टूनमध्ये अनेक कॅरेक्टर्स असल्याने त्यांना एकत्र राहण्याचं महत्त्व समजतं.
ताण कमी होतो
शाळा, अभ्यास याचा अनेकदा मुलांच्या मनावर ताण असते. मात्र कार्टून पाहिल्यावर मुलं हसतात. आनंदी राहतात. त्यामुळे त्यांच्यावर असलेला ताण थोडा हलका होण्यास मदत होते.