5 जूनला चंद्रग्रहण; जाणून घ्या - तुमच्या राशीवर काय होणार परिणाम, 'या' राशींच्या व्यक्तींनी साभाळून राहण्याची गरज

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2020 11:06 AM2020-05-30T11:06:41+5:302020-05-30T11:57:08+5:30

या वर्षात एकूण 4 चंद्रग्रहण आहेत. यापैकी एक चंद्रग्रहण 5 जूनला आहे. हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही, तसेच याचे सूतकही ग्राह्य धरले जाणार नाही. हे खग्रास चंद्रग्रहण असेल. हे ग्रहण 5 जूनच्या रात्री 11 वाजून 15 मिनिटांनी सुरू होईल आणि 6 जूनला सकाळी 2 वाजून 34 मिनिटांनी संपेल. ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहणाचा प्रभाव हा प्रत्येक राशीवर पडत असतो.

सध्या राहू आणि केतू शिवाय शनी, गुरू, शुक्र आणि प्लुटो हे चार ग्रह वक्री चलत आहेत. हे चंद्रग्रहण वृश्चिक राशीवर पडणार आहे. तर जाणून घेऊ, या चंद्र ग्रहणाचा राशींवर पडणारा प्रभाव.

मेष- कुटुंबातील सदस्यांच्या प्रकृतीकडे लक्ष द्या. या काळात मनात अनेक तनाव उत्पन्न होऊ शकतात. मात्र, आपल्याला वाद-विवादांपासून दूर रहायचे आहे. घरासंदर्भात समस्या उत्पन्न होऊ शकतात आणि निर्णय घेण्यातही काही प्रमाणात त्रास संभवतो. अशात तुम्हाला स्वतःला सांभाळावे लागेल. ग्रहण काळात मंत्राचा जप करून आपला राशी स्वामी मंगळाला मजबूत ठेवता येईल. ग्रहणकाळ संपल्यानंतर एखाद्या गरीब व्यक्तीला गुळ आणि तांदळाचे दान करा.

वृषभ- या राशीवरही या ग्रहणाचा परिणाम दिसून येणार आहे. यामुळे आपल्या एखाद्या संबंधात अचानक दुरावा निर्माण होऊ शकतो. एखाद्यासोबत व्यापारातील भागीदारी संपू शकते. यामुळे तुमच्यावर तणाव येण्याची शक्यता आहे. याकाळीत स्वतःच्या आणि पत्नीची प्रकृतीची विशेष काळजी घ्या. या ग्रहणकाळात पती-पत्नी यांच्यात भांडणही होऊ शकते. ग्रहणकाळात शुक्राच्या मंत्राचा जप करावा. ग्रहणकाळ संपल्यानतंर गरीब व्यक्तीला दूध दान करावे.

मिथुन - या काळात आपल्याला एखाद्या महिलेच्या आरोपापासून सांभाळून राहावे लागेल. कदाचीत, एखाद्या महिलेसोबत वाद होऊ शकतात, हे वाद न्यायालयापर्यंतही जाऊ शकतात. यामुळे आपल्याला अत्यंत सावध रहावे लागेल. याकाळात तुम्हाला मानसिक अशांततेचाही सामना करावा लाभू शकतो. तसेच अस्वस्थता जाणवण्याचीही शक्यता आहे. या राशीच्या महिलांनाही आपल्या प्रकृतीकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. कर्जाचे प्रकरण असेल तर त्यातही त्रास संभवतो. पैशांच्या बाबतीतही साभाळून राहण्याची आवश्यकता आहे. याकाळात बुधाच्या मंत्राचा जप करावा. ग्रहणकाळ संपल्यानंतर एखाद्या गरीब व्यक्तीला खीर दान करा.

कर्क- चंद्रग्रहण लागल्यानंतर कर्क राशीवर त्याचा थेट प्रभाव पडत असतो. कारण या राशीचा स्वामी चंद्र आहे. हे ग्रहण आपल्यासाठी काही समस्या आणू शकते. नाते, शिक्षण आणि पुत्र, या तिन्ही बाबतीत आपल्याला सावध राहण्याची आवश्यकता आहे. गर्भवती महिलांनाही स्वतःवर व्यवस्थीत लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे. नात्यात गैरसमजापासून जपून राहा. आपल्यासाठी इंद्र गायत्री मंत्र अत्यंत लाभदायक असेल. ग्रहणाच्या 15 दिवसांच्या आसपास आपल्या आईला चांदीचा ग्लास द्यावा.

सिंह- या ग्रहणकाळात आपल्या आईला तणावाचा सामना करावा लागू शकतो. त्यांच्या प्रकृतीवर लक्ष द्या. घराशी संबंधित काही समस्याही येऊ शकतात. आईबरोबर वाद होणार नाही, याची काळजी घ्या. छोट-छोट्या गोष्टींवरूनही घरात तणाव निर्माण होऊ शकतो. मात्र, आपल्याला काळजी करण्याची आवश्यकता नाही. ग्रहणकाळात सूर्य आणि चंद्राच्या मंत्राचा जप करा. तसेच ग्रहण संपल्यानंतर गुळ आणि साखरेचे दान करा.

कन्या - या काळात आत्मविश्वासात कमतरता जाणवेल. तसेच एखाद्यासोबतची मैत्रीही संपुष्टात येईल. भाऊ-बहिणीसाबतचे संबंधही खराब होऊ शकतात. एखाद्याच्या प्रकृतीसंदर्भात चिंता वाढू शकते. भागीदारीतील लाभातही फटका बसू शकतो. घरातील मोठ्या आणि लहाण व्यक्तींच्या प्रकृतीवर लक्ष ठेवा. या काळात बुधाच्या मंत्राचा जप करा. ग्रहण संपल्यानतंर एखाद्या गरीब व्यक्तीला हिरव्या पालेभाजीचे दान करा.

तूळ- या ग्रहणकाळात आपल्याला आपल्या वाणीवर सय्यम ठेवावा लागेल. अन्यथा आपल्या कार्यक्षेत्रात समस्या उत्पन्न होऊ शकते. त्यामुळे काहीही बोलण्यापूर्वी विचार करा. तोंड, दात अथवा डोळे यांसदर्भात समस्या उत्पन्न होऊ शकते. तनावातही वाढ होऊ शकते. याकाळात आपण शुक्राचा जप करावा. ग्रहणकाळ संपल्यानंतर एखाद्या गरीब व्यक्तीला तुपाचे दान करा.

वृश्चिक- चंद्रग्रहण आपल्याच राशीत पडत आहे. यामुळे मानसिक तणाव जाणवू शकतो. या काळात आपला आध्यात्माकडे कल असेल आणि यामुळे आपल्याला चांगली मदतही मिळेल. आपल्याला असेही वाटू शकते, की पुजा-पाठ केल्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नाही. मात्र, आपण विचार कराल तेवढी आपली स्थिती गंभीर नसेल. जेव्हा आपले मन विचलित होईल तेव्हा इंद्र गायत्री मंत्राचा जप करा. ग्रहणकाळ संपल्यानंतर एका तांब्याच्या लोटीत दूध भरून शिवमंदिरासमोर ठेऊन या.

धनू- याकाळात आपली निर्णय शक्ती अत्यंत कमी होऊ शकते. मनात कुठल्याही प्रकारची नकारात्मक भावना येऊ देऊ नका.या काळात आपला कल आध्यात्माकडे असेल. आपल्याला गुरूच्या मंत्राचा जप करण्याची आवश्यकता आहे. ग्रहण संपल्यानंतर एखाद्या गरीब व्यक्तीला हळदीचे एक पाकीट दान करा.

मकर- आपल्या धनलाभात कमतरता येईल. एखाद्या ठिकाणावरून पैसे येणार असतील तर ते अचानकपणे धांबततील. पत्नीकडून तक्रार अथवा सहकार्यात कमी येऊ शकते. कुटुंबातील तिसऱ्या व्यक्तीमुळे दोघांचे संबंध बिघडू शकतात. एकाच नात्यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी सर्व नात्यांना तेवढेच महत्व द्यावे. शनीच्या मंत्राचा जप करा. ग्रहण संपल्यानंतर एक पाकीट दूध आणि मोहरीचे तेल गरीब व्यक्तीला दान करा.

कुंभ- वडिलांच्या प्रकृतीकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आपले शत्रू प्रभावी होऊ शकतात. कापल्या कार्यक्षेत्रात एखादी महिला आपल्यावर आरोप करू शकते. तसेच ती तुमच्या टेन्शनचे कारणही बनू शकते. स्वतःच्या प्रकृतीकडेही लक्ष द्या. शनी मंत्राचा जप करा. ग्रहणकाळ संपल्यानंतर मोहरीचे तेल अथवा पाच पाढऱ्या मिठाईचे दान करा.

मीन - धर्माशी संबंधित एखाद्या गोष्टीवर शंका उपस्थित करू शकता. वाहन अथवा प्रवासासंदर्भात समस्या येऊ शकते. मुलांच्या प्रकृतीकडे विशेषत्वाने लक्ष देण्याची आवश्यकता. शिक्षण क्षेत्रातही लक्ष देण्याची आवश्यकता आहे. तसेच संबंधांत गैरसमजाला थारा देऊ नका. ग्रहणकाळात गुरूच्या मंत्राचा जप करा. ग्रहणकाळानंतर हरबऱ्याच्या दाळीचे दाण करा.

2020मध्ये एकूण चंद्रग्रण? - वर्ष 2020 मध्ये एकूण चार चंद्रग्रहण आहेत. हे जगाच्या वेगवेगळ्या भागांत दिसतील. 2020चे पहिले चंद्रग्रण 10-11 जानेवारीला झाले. हे ग्रहण 10 जानेवारीच्या रात्री 11 वाजून 37 मिनिटांनी मिथुन राशीवर होते. ये ग्रहण भारतासह संपूर्ण युरोप आणि ऑस्ट्रेलियामध्ये दिसले.

वर्षाचे दुसरे चंद्रग्रहण 5 जूनला आहे. हे ग्रहण रात्री 11 वाजून 15 मिनिटांनी सुरू होईल आणि 6 जूनच्या सकाळी 2 वाजून 34 मिनिटांनी संपेल. हे ग्रहण वृश्चिक राशी आणि ज्येष्ठा नक्षत्रात असेल.

2020मधील तिसरे चंद्रग्रहण 5 जुलैला रविवारी असेल. हे चंद्रग्रहण सकाळी 8 वाजून 38 मिनिटांनी प्रारंभ होईल आणि 11 वाजून 21 मिनिटांपर्यंत चालेल. हे ग्रण दिवसा असल्याने रात्री दिसणार नाही. हे ग्रहण पौर्णिमेच्या दिवशी धनू राशीत असेल.

या वर्षाचे अखेरचे चंद्रग्रहण 30 नोव्हेंबरला दुपारी 1 वाजून 34 मिनिटांनी असेल. ते 5 वाजून 22 मिनिटांनी संपेल. हे ग्रण दिवसा असल्याने भारतात दिसू शकणार नाही. ये ग्रहण रोहिणी नक्षत्र आणि वृषभ राशीत असेल.