नीरव मोदीच्या आलिशान बंगल्याची काय झाली अवस्था, पाहा फोटोंमधून...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2019 12:30 PM2019-03-08T12:30:33+5:302019-03-08T12:55:07+5:30

पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटी रुपयांचा चुना लावत परदेशात पसार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदीच्या अलिबागमधील आलिशान बंगल्याला आज स्फोटकांनी उडवून देण्यात आले.

मोदीचा १०० कोटींचा बंगला पाडण्याच्या कारवाईचा प्रारंभ, मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणीअंती रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी गेल्या २५ जानेवारी रोजी केला.

जेसीबीच्या माध्यमातून हा अत्यंत मजबूत बंगला पूर्णपणे उद्ध्वस्त करणे शक्य झाले नाही.

डायनामाइट्स स्फोटांच्या बाबतचे संपूर्ण सुनियोजित नियोजन तज्ज्ञांच्या मदतीने करून शुक्रवारी हा बंगला जमीनदोस्त करण्याचे काम सुरु झाले.

एकाचवेळी स्फाेट करुन बंगला तिन फूट खाली आला

बंगल्याचे मटेरियल काढण्याचे काम जेसीबीने सुरु करणार