ठाणे - पद्मभूषण जावेद अख्तर यांना यंदाचा ‘पंडित हरिप्रसाद चौरसिया जीवन गौरव पुरस्कार’
सातारा - संयुक्त महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची संमेलनस्थळी प्रवेशद्वारावर निदर्शने, सीमाभाग केंद्र शासनाने तात्काळ महाराष्ट्र राज्यामध्ये सामील करावा मागणी
Mangesh Kalokhe: बायकोचा पराभव, 20 लाखांत सुपारी, पुण्याचे आरोपी, रेकी केली अन् रस्त्यातच घेतला जीव; Inside Story
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 19:32 IST
1 / 7रायगडसह कोकणाला हादरवून टाकणाऱ्या माजी नगरसेवक मंगेश काळोखे हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना अखेर यश आले आहे. पोलिसांनी हत्या प्रकरणात पुण्यातून आरोपीला अटक केली आहे.2 / 7मंगेश काळोखे यांची २६ डिसेंबर रोजी म्हणजे नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर हत्या करण्यात आली होती. त्यांच्या हत्येची तिघांना २० लाख रुपयांमध्ये सुपारी देण्यात आली होती, हे स्पष्ट झाले आहे.3 / 7मंगेश काळोखे हत्या प्रकरणात पुणे कनेक्शनही समोर आले आहे. या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी रवींद्र देवकर याने इशा पापा शेख हिच्या मार्फत हत्या करणाऱ्यांना सुपारी दिली होती. आदिल मुखत्यार शेख, खालीद खलील कुरेश आणि आणखी एकजण अशा तिघांना २० लाखात सुपारी दिली गेली होती, असे पोलिसांनी सांगितले.4 / 7मुख्य आरोपी आणि हत्या करणारे यांच्यातील आर्थिक व्यवहार, मोबाईलवरून केलेले कॉलची माहिती, तसेच आरोपींनी दिलेली माहिती यावरून हत्येचा सगळा कट समोर आला.5 / 7फरार आरोपीला वानवडी पोलिसांनी अटक केली. खालीद खलील कुरेशी (२३) असे या आरोपीचे नाव आहे. त्याला सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यात खलीलचे नाव समोर आले होते. तपासात खालीद हडपसरमधील हांडेवाडी भागात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याला सापळा लावून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने काळोखे यांचा दोन मित्रांच्या साथीने खून केल्याची कबुली दिली.6 / 7खोपोली नगरपालिका निवडणुकीत मंगेश काळोखे यांच्या पत्नी मानसी काळोखे या उर्मिला देवकर यांचा पराभव करून विजयी झाल्या होत्या. देवकर आणि काळोखे या कुटुंबाचे आधीपासूनच वैर होते. या कारणाने पोलिसांनी दोन दिवस चोख बंदोबस्त दोघांच्या घराशेजारी तैनात केला होता.7 / 7मंगेश यांनी रवींद्र देवकर यांना पूर्वीच मारण्याची धमकी दिली होती. काळोखे यांच्यावरही अनेक गुन्हे दाखल होते. पत्नीचा पराभव आणि पूर्वीचे वैर याचा राग मनात ठेवून रवींद्र देवकर यांनी काळोखे यांना मारण्याची सुपारी दिली होती.