शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Mahad Flood : 'आपत्ती व्यवस्थापन करणारेही माणसंच, 'त्या' प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचं स्पष्ट उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2021 4:27 PM

1 / 11
मुसळधार पाऊस, पूर आणि भूस्खलनाच्या घटनांमुळे कोकणातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनामुळे रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील तळीये गावात ४० हून अधिक ग्रामस्थांचा मृत्यू झाला आहे.
2 / 11
या गावात अद्यापही बचावकार्य सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर तळीये गावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भेट दिली. त्यावेळी, घडलेल्या दुर्घटना पाहता सरकारकडून पुनर्वसन आराखडा आणि जल मॅनेजमेंट करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
3 / 11
निसर्ग कोपात आक्रीत घडलं, हे पाहिल्यानंतर, डोंगरदऱ्यातील लोकांचे पुनर्वसन करण्यासाठी सरकार आराखडा तयार करेल.
4 / 11
वेधशाळा अंदाज व्यक्त करते, पण त्याचं प्रमाण आणि परिणाम कुणालाही सांगता येत नाही. कालपासून सातारा, सांगली, कोल्हापूर भागात खूप तणाव होता.
5 / 11
नद्यांचं पाणी शहरात शिरलं आहे, ते पाहता नद्यांच्या वाहत्या पाण्यासाठी वॉटर मॅनेजमेंटचाही आराखडा करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
6 / 11
मुख्यमंत्री महाड तालुक्यातील दुर्घटनाग्रस्त तळीये गावात दाखल झाले आहेत. दरड कोसळलेल्या ठिकाणी ते पाहणी करत असून त्यांच्याबरोबर मंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री आदिती तटकरे तसेच खासदार सुनिल तटकरे हे देखील उपस्थित आहेत.
7 / 11
पुढे बोलताना ते म्हणाले की, ज्यांच नुकसान झालं आहे, त्यांना सरकार सर्वोतोपरी मदत करेल. जल व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न आहे. केंद्रीय यंत्रणांकडून व्यवस्थित सहकार्य मिळत आहे.
8 / 11
सर्वच ठिकाणी आपली पथकं पोहोचत आहेत. अनेक ठिकाणच्या नागरिकांचं स्थलांतर केलं आहे, अद्यापही जिथं गरज आहे, तेथील नागरिकांचं स्थलांतर करण्यात येत आहे.
9 / 11
आपत्ती व्यवस्थापन पुरेशा प्रमाणात आणि तातडीने येत नाहीत, असा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारण्यात आला होता. त्यावर, उत्तर देताना हे आरोप योग्य नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले.
10 / 11
आपत्ती व्यवस्थापन करणारीही माणसंच आहेत, रस्ते खचलेत, पूर येतोय तेथे घटनास्थळी पोहोचायला त्यांनाही वेळ लागत आहे.
11 / 11
पावसाची, वाहत्या पाण्याची अडचण आहे. मात्र, या टीम त्यांचं काम जोमानं करत आहेत, असेही उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
टॅग्स :Raigadरायगडfloodपूरmahad-acमहाड