पुण्यात चाललंय काय? सहा महिन्यांत 47 जणांची हत्या, महिन्याला 7 ते 8 हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 16:19 IST
1 / 7पुणे शहरात दर महिन्यात ७ ते ८ खुनाच्या घटना घडत आहेत. अनेकांवर प्राणघातक हल्ले होत आहेत. यामुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. किरकोळ कारणातून हल्ल्याच्या घटना घडत आहेत.2 / 7काही महिन्यांपूर्वी सुरू केलेली कॉप्स २४ ही संकल्पना अशा प्रकारचे गंभीर गुन्हे रोखण्यास सपशेल अपयशी ठरली आहे.3 / 7शहराला अमली पदार्थाचा विळखा पडला असून, युवा पिढी मोठ्या संख्येने अमली पदार्थांच्या आहारी जाताना विविध घटनांवरून दिसून येत आहे. सहा महिन्यांत (१२ जुलैपर्यंत) शहरात ४७ खुनाचे गुन्हे घडले. यासह ९६ जणांच्या खुनाचा प्रयत्न झाला.4 / 7पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी गेल्यावर्षी शहरातील सर्व गँगस्टरची पोलिस आयुक्तालयात बोलवून परेड घेतली होती. त्यानंतर सध्या तरी शहरातील गँगवॉर थंड आहे. नशेखोरीला मात्र ऊत आल्याचे पोलिसांनी केलेल्या कारवायांवरून दिसून येत आहे.5 / 7शहरात दिसून वारंवार विविध भागांमध्ये गांजा, एमडी, अफू असे अमली पदार्थ मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याने त्याची मागणी केवढ्या मोठ्या प्रमाणात आहे, हे सिद्ध होते.6 / 7१ जानेवारी ते १२ जुलै या कालावधीत शहरातील पोलिस ठाण्यांमध्ये खुनाचे ४७ गुन्हे नोंदवले गेले आहेत. गेल्या वर्षी ही संख्या ५१ एवढी होती. याशिवाय खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी यंदा ९८ गुन्हे आतापर्यंत दाखल असून गेल्या वर्षी या गुन्ह्यांचे प्रमाण ७६ एवढे होते.7 / 7पुणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत ३९ पोलिस ठाण्यांचा समावेश होतो. आयुक्तालयाची हद्द मोठी असल्याने या व्यतिरिक्त ४ ते ५ नव्या पोलिस ठाण्यांची शहराला गरज आहे. याशिवाय नव्याने एक परिमंडळ आणि ४ ते ५ हजार पोलिस कर्मचारी या शहरासाठी गरजेचे आहे. याबाबत आयुक्तालय स्तरावरून प्रस्ताव शासनाकडे दिला.