Pune Metro Photos: पुण्यात ३० मीटर जमिनीत मेट्रोचे साकारतेय वेगवान जग

By राजू इनामदार | Published: August 24, 2022 02:17 PM2022-08-24T14:17:37+5:302022-08-24T14:22:35+5:30

महामेट्रोचा शिवाजीनगर ते स्वारगेट हा भुयारी मार्ग म्हणजे पुण्याखालचे एक नवे जगच आहे. ६ किलोमीटर अंतराच्या या मार्गात ५ स्थानके आहेत. जमिनीपासून २८ ते ३० मीटर खोलीवर असणारा हा मार्ग म्हणजे एक मोठ्ठी ट्यूब आहे. त्यातून ताशी कमाल ८० किलोमीटर वेगाने मेट्रो धावेल. जाणाऱ्या व येणाऱ्या अशा दोन मार्गांसाठी दोन बोगदे आहेत. प्रत्येक स्थानकात ते एकत्र येतील व पुढे पुन्हा वेगळे होतील. पुण्याखाली तब्बल ३० मीटर खोलीवर असणाऱ्या या नव्या जगाची ही छायाचित्र सफर. (सर्व छयाचित्रे :- आशिष काळे)

स्काय लाइट बीम - ही विशेष प्रकारची रचना आहे. प्रत्येक स्थानकावर ती आहे. स्थानकाच्या बरोबर मध्यभागातून थेट वरपर्यंतचे आकाश दिसणार आहे. तिथून सूर्यप्रकाश आत स्थानकात पसरेल.

क्रॉसिंग लाइन - दोन बोगद्यांतील ट्रेन या ठिकाणी मार्ग बदलू शकतील. म्हणजे डावीकडची उजवीकडे किंवा उजवीकडची डावीकडे. हीसुद्धा विशेष व्यवस्था आहे.

अपलाइन - म्हणजे सिव्हिल कोर्ट ते शिवाजीनगर स्थानक या बोगद्यात रेल्वे ट्रॅक टाकण्याचे काम सध्या सुरू आहे.

पॅसेज - बोगद्यामध्ये काही आणीबाणीची स्थिती निर्माण झाली, तर प्रवाशांना एका बोगद्यातून दुसऱ्या बोगद्यात जाण्यासाठीची ही व्यवस्था आहे. शिवाजीनगर ते स्वारगेट या अंतरात असे एकूण ६ पॅसेज आहेत.

ड्रेनेज - बोगद्यांमध्ये साचून राहणारे पाणी बाहेर काढण्यासाठीही खास व्यवस्था आहे. सर्व पाणी एका ठिकाणी जमा होऊन तिथून ते बाहेर नेले जाईल.

टनेल - दोन्ही बोगद्यांचे बांधकाम आता पूर्ण झाले आहे. आतून हा बोगदा असा एखाद्या ट्यूबसारखा दिसतो.