Pune Fights Omicron: शिवाजीनगरचे जम्बो कोव्हीड सेंटर ९०० बेडने सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2021 18:00 IST2021-12-07T17:54:25+5:302021-12-07T18:00:37+5:30
दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळलेल्या ओमायक्रॉन व्हेरियंटने आता महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. पुण्यातही ओमायक्रॉन या नव्या विषाणूने शिरकाव केला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये तब्बल ६ तर पुणे शहरात एक असे रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिका प्रशासन सज्ज झाले असून शहरातील शिवाजीनगरच्या जम्बो कोव्हीड सेंटरमध्ये ३०० ऑक्सिजन बेड, ३१ व्हेंटिलेटर बेड आणि ६०० जनरल बेड असे एकूण ९३१ बेड तयार ठेवण्यात आले आहेत. पुण्यात आढळून आलेल्या सातही रुग्णांची प्रकृती स्थिर असून घाबरण्याचे काही कारण नसल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले आहे. पण नागरिकांनी त्वरित कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घ्यावेत असे आवाहनही त्यांनी केले आहे. (सर्व छायाचित्रे : तन्मय ठोंबरे)