शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Photos: चित्रपटसृष्टीच्या चंदेरी दुनियेतील दोन तारे; 'धरमवीर’ च्या जोडीनं घडवलं रसिकांना प्रेमाचे दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2023 12:52 PM

1 / 9
- निमित्त होते, सिंबायोसिस अभिमत विद्यापीठातर्फे आयोजित सांस्कृतिक महोत्सवाचे.
2 / 9
- एक होते ‘ही मॅन’ धर्मेंद्र अन् दुसरे ‘चॉकलेट हिरो’ जितेंद्र
3 / 9
- पडद्यावर साकार होणारी त्यांच्या गाण्यांची चित्रफीत... प्रत्यक्षात त्यांच्या उपस्थितीत सादर होणारी गाणी अन् त्यांनी प्रत्येक गाण्यांमागचा उलगडलेला आठवणींचा सुगंध... अशा भारावलेल्या वातावरणामुळे दोघांसह रसिकही भूतकाळात रमले.
4 / 9
- जितेंद्र यांनीही मिश्किलपणे व्ही. शांताराम’ यांचा ‘गीत गाया पत्थरोने’ हा पहिला चित्रपट कसा मिळाला याची आठवण सांगितली.
5 / 9
- पुण्यातील आठवणींना उजाळा देताना धर्मेंद्र म्हणाले, प्रभात स्टुडिओमध्ये मी शूटिंग केले आहे. मला ते गुरुकुल वाटायचे. जुने पुणे आज खूप आठवते. झाशीच्या राणीच्या पुतळ्यासमोर कायम वंदन करायला यायचो असे सांगत ’काश यादो में जान होती तो पास बुला लेता, उस से बाते करता... अशी शायरीही त्यांनी पेश केली.
6 / 9
-वयाची ऐशी ओलांडली तरी ‘चिरतरुण’ असलेल्या धर्मेंद्र-जितेंद्र यांचे गारुड रसिकमनावर कायम आहे. याची प्रचिती आली.
7 / 9
- पडद्यावर ‘सात अजुबे इस दुनिया मैं आठवी अपनी जोडी, ये है ‘धरमवीर’ की जोडी असे म्हणणाऱ्या दोघांनी एकमेकांना आलिंगन देत पुन्हा एकदा ‘धरमवीर’च्या अद्भुत प्रेमाचे दर्शन रसिकांना घडविले.
8 / 9
- ‘धरमवीर की जोडी’ या संगीत रजनीमध्ये धर्मेंद्र-जितेंद्र यांच्या गाण्यांची मालिका मकरंद पाटणकर, अली हुसेन, राधिका आपटे या कलाकारांनी सादर केली. कलाकारांच्या सादरीकरणाला दोघांनी मनमुराद दाद दिली.
9 / 9
- निवृत्त झाल्यानंतर मस्त पुण्यात राहून उर्वरित आयुष्य घालवू असे वाटले; पण काय करू, निवृत्त होण्याचे मनच करीत नाही, असे सांगत धर्मेंद्र यांनी अजूनही मी रोमँटिक असल्याची मिश्कील टिप्पणी केली
टॅग्स :PuneपुणेsymbiosisसिंबायोसिसDharmendraधमेंद्रJitendraजितेंद्रcinemaसिनेमा