मणिपुरी नागरिकांसह विरोधकांचा पंतप्रधान मोदींच्या पुणे दौऱ्याला कडाडून विरोध; पाहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2023 10:10 IST2023-08-01T09:53:44+5:302023-08-01T10:10:55+5:30
पंतप्रधान जवाब दो, पंतप्रधान परत जा, मणिपूरला जा, अशा घोषणा मणिपूरी नागरिकांनी महात्मा फुले मंडईसमोर दिल्या. प्रत्येकाने हातामध्ये फलक घेतले होते. त्यात लहान मुलेही सहभागी झाले होते. तसेच शहराच्या इतर ठिकाणीही काँग्रेससह, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना (उद्धव ठाकरे गट) हे आक्रमक झाले आहेत.

पंतप्रधान परत जा, अशा आशयाचा फ्लेक्स घेऊन आंदोलन सुरू

सर्व विरोधकांनी पंतप्रधानांच्या पुणे दौऱ्याचा निषेध नोंदविला

ईशान्य भारतातील विद्यार्थ्यांनीही या आंदोलनात भाग घेतला

आमच्यापेक्षा मते महत्त्वाची आहेत का? असे फलक दिसत आहेत

मणिपूर जळतंय, लोकशाही वाचवा अशा घोषणा देण्यात आल्या

यावेळी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला

सकाळी ९ वाजल्यापासून हे आंदोलन सुरू आहे


















