PHOTOS: कर्नाटकच्या एसटीवर 'जय महाराष्ट्र'; पुण्यात शिवसैनिकांकडून निषेध
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2021 20:47 IST2021-12-18T20:04:09+5:302021-12-18T20:47:34+5:30
पुणे: कर्नाटकातील बेंगळुरू येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या विटंबनेच्या निषेधार्त पुण्यात शिवसैनिकांनी कर्नाटकच्या एसटीला काळे फासले आहे. तसेच ह्या बसेसवर भगव्या रंगात जय महाराष्ट्र, शिवसेनेचा विजय असे लिहून कर्नाटक सरकारचा निषेध व्यक्त केला. यावेळी संतप्त शिवसैनिकांनी कानडी दडपशाहीला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

स्वारगेट जवळच्या पार्किग च्या जागेत कर्नाटकच्या एसटी गाड्या लावण्यात आलेल्या होत्या. दुपारी पाचच्या सुमारास काही शिवसैनिक एकत्रित येऊन घोषणाबाजी करीत गाडीवर काळी शाई फेकली


तसेच भगव्या रंगात गाड्यावर जय महाराष्ट्र असे लिहिले आहे

जवळपास १० ते १५ गाडयांना काळे फासून कानडी दडपशाहीचा निषेध व्यक्त केला.

पुणे शिवसेना पक्षाकडून निषेध

'जय महाराष्ट्र' लिहत व्यक्त केला निषेध


















