गौरव आहुजाने घेतला युटर्न...! पुण्याहून कोल्हापूरला गेलेला, तिथून कुठे निघालेला?; दिवसभरात त्याने काय केले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2025 12:40 IST
1 / 9येरवडा चौकात मद्यधुंद अवस्थेत सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करून अश्लील वर्तन करणारा गौरव आहुजा हा जवळपास १०-१२ तासांनी पोलिसांना शरण गेला आहे. 2 / 9तसेच त्याच्यावर गुन्हा दाखल होताच तो पसार झाला होता. 3 / 9रात्रीपर्यंत त्याने प्रसारमाध्यमांना मुलाखत, एक व्हिडीओ जारी करून माफी मागितली आहे. दरम्यान, काल दिवसभरात त्याने कुठे-कुठे प्रवास केला याची माहिती समोर आली आहे. 4 / 9गौरव आहुजा याने पुण्यातील येरवडा चौकात अश्लील चाळे करुन कोल्हापूरच्या दिशेने गाडी घेऊन गेला. कोल्हापूरात त्याची स्वत:ची बीएमडब्लू कार पार्क केली. तिथून तो दुसरीच कार घेऊन धारवाडच्या दिशेने रवाना झाला. 5 / 9येरवडा चौकात अश्लील चाळे केल्यानंतर गौरव आहुजा पुण्यावरून कोल्हापूरला गेला. कोल्हापूर शहराच्या २० किलोमीटर अलीकडे त्याने बीएमडब्लू कार पार्क केली.6 / 9यावेळी त्याने ऑटो वाल्याला धारवाडला जाण्याची चौकशी केली. त्यासाठी चारचाकी भाड्याने मिळेल का? अशी चौकशी केली. यावेळी एका स्थानिक रिक्षावाल्याने त्याला गाडी मॅनेज करून दिली.7 / 9रस्त्यात संकेश्वरपर्यंत गेल्यावर गौरव याने ड्रायव्हरला गाडी पुण्याच्या दिशेने वळवायला सांगितली. पुन्हा येरवड्याला सोडा, असं तो ड्रायव्हरला म्हणाला.8 / 9या ड्रायव्हरलाच त्याने माफी मागताना व्हिडीओ रेकॉर्ड करायला सांगितला. 9 / 9व्हिडीओ तयार करून त्याने मित्रांना व्हायरल केला.