पूजाच्या आयडियाची भन्नाट कल्पना, खराब टायरपासून नवीन शूज अन् सँडल

By महेश गलांडे | Published: December 23, 2020 10:39 AM2020-12-23T10:39:08+5:302020-12-23T11:18:03+5:30

पुण्यातील रहिवाशी असलेल्या पूजा बदामीकर यांनी खराब टायरपासून नवीन शूज आणि सँडल बनविण्याचा उद्योग उभारलाय. सध्या त्यांचा उद्योग जोमाने सुरू असून त्यांच्या यशस्वीतेची कहाणी चर्चेचा विषय बनली आहे.

इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण झाल्यावर एका आयटी कंपनीत नोकरी मिळाली, तेथील जबाबदाऱ्या सांभाळून डिप्लोमाचे शिक्षणही सुरू होते; पण पूर्ण वेळ नोकरी हे काही ध्येय नाही, इतरांपेक्षा काही तरी वेगळे करायला हवे, हा विचार तिच्या मनात घोळत होता.

याच वेळी अभ्यासक्रमात टाकाऊतून टिकाऊ उत्पादन बनविण्याचा प्रकल्प सुरू झाला आणि तिथूनच त्यांना करिअरची नवी दिशा मिळाली... टाकाऊ टायरपासून उत्तम दर्जाच्या चपला बनविणाऱ्या नवोदित उद्योजिका पूजा आपटे - बदामीकर यांचा प्रवास प्रेरणादायी ठरला.

पूजा बदामीकर यांची कारागिरांची टीम टाकाऊ टायरच्या वापरताना इको फ्रेंडली चप्पल, सँडल्स तयार करतात. गेल्या काही वर्षांत वाहन उद्योगाला जेवढी चालना मिळाली आहे, तेवढेच टायरचे उत्पादन आणि परिणामी वापरून खराब झालेल्या टायरचा कचराही प्रचंड वाढला आहे.

नैसर्गिकरीत्या टायरचे विघटन होण्यास शेकडो वर्षे लागतात. टायर जाळल्यास विषारी वायूंचे उत्सर्जन होते. हे दोन्ही टाळून त्याच्या पुनर्वापराचा पर्याय पूजा आपटे यांनी निवडला आहे. या उत्पादनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्यासाठी त्यांनी नेमिताल हा ब्रँड विकसित केला आहे.

यातून त्यांनी पर्यावरण संरक्षणाचा वसा तर घेतलाच आहे; पण छोट्या कारागिरांना रोजगारही दिला आहे. हे उत्पादन यशस्वी ठरण्यामागे त्यांनी खूप परिश्रम घेतले आहेत.

इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत असताना शैक्षणिक उपक्रमाचा भाग म्हणून आम्हाला प्लास्टिक, टायर आणि इतर काही विषय प्रकल्पासाठी त्यांना देण्यात आले होते. प्लास्टिकच्या पुनर्वापरावर अनेक जण संशोधन करत आहेत. त्यामुळे टायरचा पर्याय निवडला.

टायरचा कचरा वाढतो आहे; पण शास्त्रीयदृष्ट्या विघटनासाठीचे पर्याय मर्यादित आहेत. टायरपासून टाइल्स असा एक पर्याय होता; पण त्यासाठी केमिकल क्षेत्रातील शिक्षणाची गरज होती किंवा कोणावर तरी अवलूंन राहावे लागणार होते.

त्यामुळे टायर क्रम (बारीक तुकडे) नसलेले उत्पादन करायचे ठरवले. टायर जाळायचे नाही, त्याचा हाताला, चेहऱ्याला किंवा शरीराला स्पर्श होणार नाही उत्पादनही होईल, असा पर्याय शोधताना मला चप्पल करता येईल, ही कल्पना सुचली

टायरची चप्पल बनविण्यासाठी त्यांनी स्थानिक चर्मकारंच्या भेटी घेतल्या, त्यांना कल्पना सांगितली. त्यातील एक-दोन जणांनी होकार दिला. टायरच्या सोलवर कार्डबोर्ड आणि कापडाचा वापर करून आम्ही चप्पल तयार केली. हे उत्पादन मी स्टार्ट यात्रेत सादर केले.