शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थीनी खुश, प्रियंका गांधीसोबत बोटीची सफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 22:35 IST

1 / 5
काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी वाड्रा या तीन दिवसांच्या उत्तर प्रदेश दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावेळी त्यांनी गंगा नदीचे पर्यटन करण्याचा आनंद लुटला. त्यावेळी बोटीत काही विद्यार्थीनींनाही प्रियंका यांनी आपल्या सोबत घेतले होते.
2 / 5
प्रियंका यांनी वेगवेगळ्या ठिकाणी विविध विद्यार्थ्यांशी चर्चा केली. विद्यार्थ्यांच्या समस्या आणि युपीचा विकास यांसदर्भात विद्यार्थ्यांचे मत जाणून घेतले.
3 / 5
प्रियंका यांच्यासोबत बोटीत बसलेल्या विद्यार्थींनी या प्रयागराज येथील कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थींनी होत्या. प्रियंका यांच्यासोबत असलेल्या विद्यार्थींनी वेगवेगळ्या विषयांतून पदवीधर होत्या.
4 / 5
विशेष म्हणजे प्रियंका गांधी वाड्रा या मानसशास्त्र विषय शिकल्या आहेत. त्यामुळे या बोटीतील प्रवासात एका मानसशास्त्र विषयातील विद्यार्थीनीशी त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या.
5 / 5
प्रियंका गांधींनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ट्वीट करत बोटीतील विद्यार्थींनींसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. तसेच मी खूप युपीतील खूप टॅलेंटेड विद्यार्थीनींना भेटल्याचेही प्रियंका यांनी लिहले आहे.
टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीUttar Pradeshउत्तर प्रदेशStudentविद्यार्थी