शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Pooja Chavan: इंग्रजी आलं तर जग जिंकू...असं तिला वाटायचं, पूजा चव्हाणची स्वप्न काय होती पाहा

By मोरेश्वर येरम | Published: February 13, 2021 11:26 AM

1 / 10
बीडच्या परळीतील पूजा चव्हाण (Pooja Chavan) नावाच्या तरुणीने पुण्याच्या वानवडी येथे आत्महत्या केली. पण तिच्या आत्महत्येनंतर काही ऑडिओ क्लिप्ससमोर आल्या आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. तिच्या आत्महत्येप्रकरणी शिवसेनेच्या एका मंत्र्याचं नाव पुढे येतंय. पूजा चव्हाण नेमकी कोण होती? ती पुण्यात का आलेली? हे आपण जाणून घेऊयात...
2 / 10
पूजा चव्हाण ही २२ वर्षीय तरुणीला स्टार व्हायचं होतं. तिला खूप मोठं व्हायचं होतं. तशी ती टिकटॉक स्टारही झाली. पण तिला समाजासाठी देखील काम करायचं होतं.
3 / 10
पूजा चव्हाण सामाजिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्यायची. आपल्या बंजारा समाजाच्या विकासासाठी काम करायचंय असं ती नेहमी सांगायची.
4 / 10
आपलं इंग्रजी व्यवस्थित नाही हे तिच्या लक्षात आलं. इंग्रजी आलं तर जग जिंकू आणि आपली छाप पाडू असं तिला वाटायचं म्हणूच ती इंग्रजी शिकण्यासाठी बीडहून थेट पुण्यात आली होती.
5 / 10
इंग्रजी शिकण्यासाठी पुण्याची वाट धरलेली पूजा चव्हाण पुण्यात आली. पण दोन आठवडेही राहिली नाही तोच तिनं आत्महत्या केली.
6 / 10
पूजा चव्हाण सोशल मीडियावर चांगली सक्रीय होती. बंजारा समाजाच्या अनेक कार्यक्रमांना ती उपस्थित असायची. राजकी आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये तिला रस असायचा.
7 / 10
अवघ्या २२ वर्षांची पूजा तरुणाईत प्रसिद्ध असलेल्या टिकटॉक अॅपवरही खूप लोकप्रिय होती. टिकटॉकवर ती सातत्यानं व्हिडिओ टाकायची. तिथं तिचा मोठा फॅन फॉलोइंग होता.
8 / 10
पूजा चव्हाण अवघ्या २२ वर्षांची असूनही ती अनेक तरुणींची ती रोल मॉडल झाली होती. कारण बंजारा समाजातून पुढे येऊन तिनं आपली स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली होती. अनेक तरुणींनाही पूजा सारखं व्हावंसं वाटायचं.
9 / 10
इंग्रजी बोलता यावं, समाजासमोर काहीतरी करुन दाखवावं आणि स्टार व्हावं अशी स्वप्न बाळगलेल्या पूजानं सारंकाही सुरळीत सुरू असताना आत्महत्येचं टोकाचं पाऊल का उचललं? यानं सर्वांनाच आश्चर्य वाटलं.
10 / 10
आत्महत्या करण्यापूर्वी ती कसली तरी ट्रिटमेंट घेत होती, असं सांगितलं जात आहे. पण ती कसली ट्रिटमेंट घेत होती हे अद्याप उघड झालेलं नाही. त्यामुळे जगासमोर सारंकाही आलबेल असल्याचं दाखवणाऱ्या पूजाच्या मनात नेमकं काय सुरू होतं? हा असा सवाल उपस्थित केला जात आहे. तिच्या मृत्यूचं गूढ आता अधिकच वाढलं आहे.
टॅग्स :Pooja Chavanपूजा चव्हाणPuneपुणेSanjay Rathodसंजय राठोड