शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ज्या पक्षासोबत स्थापन केली सत्ता, त्याच मित्राला भाजपनं दिला झटका; ६ आमदार फोडले

By कुणाल गवाणकर | Published: December 26, 2020 3:07 PM

1 / 10
नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप क्रमांक दोनचा पक्ष ठरला. भाजपनं जेडीयूसोबत लढत सत्ता कायम राखली.
2 / 10
भाजपनं जेडीयूपेक्षा जास्त जागा जिंकल्या असल्या तरीही मुख्यमंत्रिपद ठरल्याप्रमाणे जेडीयूच्या नितीश कुमार यांच्याकडे कायम ठेवलं. मात्र नव्या सरकारमध्ये भाजपचा वरचष्मा आहे.
3 / 10
बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये नितीश कुमार यांचा जेडीयू थेट तिसऱ्या क्रमांकावर गेला. जेडीयूच्या आमदारांची संख्या ७१ वरून ४३ वर आली.
4 / 10
बिहारमध्ये निवडणुकीत मोठा फटका सहन कराव्या लागलेल्या जेडीयूला आता अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपनं झटका दिला आहे.
5 / 10
जेडीयूचेच्या सातपैकी सहा आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. जेडीयू बिहार आणि केंद्रात भाजपसोबत असताना भाजपनं अरुणाचल प्रदेशात मित्रपक्षाला जोरदार धक्का दिला आहे.
6 / 10
जेडीयूच्या सहा आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या वृत्ताला भाजप प्रदेशाध्यक्ष बी. आर वाघे यांनी दुजोरा दिला. आम्ही त्यांना पक्षात सामील करून घेतलं असल्याचं ते म्हणाले.
7 / 10
जेडीयूचे सहा आमदार भाजपमध्ये गेल्याच्या वृत्ताला जेडीयूचे अध्यक्ष नितीश कुमार यांनीदेखील दुजोरा दिला. याबद्दल पक्ष बैठक घेईल, असं त्यांनी सांगितलं.
8 / 10
भाजपमध्ये गेलेल्या सहापैकी तीन आमदारांना जेडीयूनं कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल ही नोटीस दिली गेली होती.
9 / 10
भाजपचं कमळ हाती घेतलेल्या सहा आमदारांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना न कळवता तालेम तबोह यांची निवड विधिमंडळ गटनेते म्हणून केले. हा निर्णय परस्पर घेण्यात आला.
10 / 10
पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचलच्या (पीपीए) एकमेव आमदारानंदेखील भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे ६० आमदार असलेल्या अरुणाचल प्रदेश विधानसभेतील भाजप सदस्यांची संख्या ४१ वरून ४८ वर पोहोचली आहे.
टॅग्स :BJPभाजपाJanta Dal Unitedजनता दल युनायटेडArunachal Pradeshअरुणाचल प्रदेश