शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

युती अन् आघाडीच्या राजकीय कुटुंबातील ‘यांना’ स्वीकारलं, तर ‘यांना’ नाकारलं

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2019 4:23 PM

1 / 8
आदिती तटकरे, राष्ट्रवादी- विजयी; राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कन्या. येथील राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अवधूत तटकरे यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे आदिती यांनी प्रथमच निवडणूक लढवित श्रीवर्धन मतदारसंघातून विजय मिळविला.
2 / 8
देवयानी फरांदे, भाजपा- विजयी; विधान परिषदेचे माजी सभापती ना. सं. फरांदे यांच्या स्नुषा. नाशिक मध्य मतदारसंघामधून सलग दुसऱ्यांदा विजयी झाल्या आहेत.
3 / 8
वर्षा गायकवाड, काँग्रेस- विजयी; काँग्रेसचे खासदार एकनाथराव गायकवाड यांची कन्या. मुंबईमधील धारावी मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा विजयी झाल्या आहेत.
4 / 8
प्रणिती शिंदे, काँग्रेस- विजयी; माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कन्या. सोलापूर मध्यमधून दुस-यांदा विजयी. येथे सुशीलकुमार शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.
5 / 8
पंकजा मुंडे, भाजप- पराभूत; भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची कन्या. घरच्याच म्हणजे परळी मतदारसंघामध्ये त्यांना चुलत बंधू धनंजय मुंडे यांनी पराभूत केले. प्रचारादरम्यान या भावा-बहिणीमध्ये आरोपांच्या फैरी झडल्या.
6 / 8
निर्मला गावित, शिवसेना- पराभूत; माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित यांच्या कन्या. काँग्रेसचा राजीनामा देऊन शिवबंधन बांधले होते. इगतपुरी मतदारसंघातून ‘त्या’ पराभूत झाल्या.
7 / 8
रोहिणी खडसे; भाजप- पराभूत; माजी मंत्री भाजपचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या जळगावमधल्या मुक्ताईनगरमधून पराभूत झाल्या. खडसे यांची उमेदवारी कापल्यानंतर भाजपने त्यांच्या कन्येला निवडणुकीमध्ये उतरविले होते.
8 / 8
स्नेहलता कोल्हे, भाजप- पराभूत; माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या स्नुषा. नगर जिल्ह्यातील कोपरगाव काळे-कोल्हे या दोन गटांमधील शह-काटशह पुढच्या पिढीतही सुरूच असलेले दिसते.
टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Pankaja Mundeपंकजा मुंडेVarsha Gaikwadवर्षा गायकवाड