जगातील सर्वात सेक्सी ॲथलीट 'Alica Schmidt', सोशल मीडियावर हॉट फोटोंची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2022 06:47 PM2022-10-13T18:47:45+5:302022-10-13T18:59:20+5:30

Worlds sexiest athlete Alica Schmidt : सोशल मीडियावर सक्रिय ॲलिसाचे लाखो चाहते आहेत.

युरोपियन सेन्सेशन आणि 23 वर्षीय जर्मन ॲथलीट ॲलिसा स्मिडला (Alica Schmidt) 'जगातील सर्वात सेक्सी ॲथलीट' म्हटले जाते. वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी ॲलिसाला जगातील सर्वात सेक्सी ॲथलीटचा टायटल मिळाला होता. तेव्हा ती म्हणाली होता की, सौंदर्याच्या दृष्टिकोनातून खेळाडूंनाही आकर्षक मानले जाऊ शकते, हे मोठे आश्चर्य आहे.

सोशल मीडियावर सक्रिय ॲलिसाचे लाखो चाहते आहेत. स्टेडियमच्या ट्रॅकपासून इंटरनेटच्या रस्त्यांपर्यंत पसरलेल्या ॲलिसाने अलीकडेच समुद्रात उडी मारताना बिकिनीमध्ये पोज दिली, तेव्हा तिचे चाहते फक्त पाहतच राहिले.

'द सन'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, जेव्हा ॲलिसा स्मिड ट्रॅकवर धावत असते, तेव्हा ती डोळ्याची पापणी लवते ना लवते तोवर गायब होते. इंटरनेटच्या जगात तिचे लाखो चाहते आहेत. पण यावेळी तिने निळ्या रंगाच्या बिकिनीमधला स्वतःचा फोटो शेअर केल्यावर इंटरनेटवर खळबळ उडाली. या ॲथलीटचा बिकिनी अवतार इंस्टाग्रामवर व्हायरल होत आहे.

ॲलिसाची जर्मनीच्या सर्वात कमी धावपटूंमध्ये गणना केली जाते. ती दीर्घकाळापासून ॲथलेटिक्समध्ये चांगली कामगिरी करत आहे. 2017 च्या युरोपियन अंडर-20 ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपपासून तिचा यशाचा प्रवास सुरू झाला. जिथे तिने 4×400 रिले शर्यतीत रौप्य पदक जिंकले.

पुढे, ॲलिसाने युरोपियन अंडर-23 मध्ये रिले शर्यतीत कांस्यपदक जिंकून यशाचा प्रवास सुरूच ठेवला. अलीकडेच, ॲलिसाने आपल्या मादक बिकिनी पोझने लोकांच्या हृदयाचे ठोके वाढवून लोकांना अवाक् केले. चाहते तिच्या प्रत्येक फोटोला लाईक करतात आणि लगेच कमेंट करून तिच्याबद्दलचे प्रेम व्यक्त करतात.

थायलंडमध्ये आपली सुट्टी एन्जॉय केल्यानंतर आता अॅथलेटिक्स सीजनपूर्वी पुढील स्पर्धेसाठी ॲलिसा खूप मेहनत करत आहे. या सुंदर ॲथलीटला तुम्ही जर्मनीची उड्डाणपरी म्हणू शकता. शर्यत मोठी असो किंवा लहान असो, बाकीच्या स्पर्धकांना सेकंदात मागे टाकण्याच्या तिच्या कलेने जगाला वेड लावले आहे.

ॲलिसाला असेच 'जगातील सर्वात सेक्सी ॲथलीट' म्हटले जात नाही. तर तिच्या सौंदर्यामुळे तिला तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात एका लोकप्रिय मासिकातून हा टायटल मिळाला होता. अॅलिसाने आपला टायटल कायम ठेवला आहे.

ॲलिसा तिच्या इंस्टाग्राम पोस्ट्स आणि व्हिडिओंद्वारे लोकांचे लक्ष वेधून घेते. गेल्या उन्हाळ्याच्या सीजनमध्ये तिने युरोपियन ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये आपल्या देश जर्मनीसाठी चमकदारपणे धाव घेतली. 4x400 मीटर रिलेच्या अंतिम फेरीत पाचव्या स्थानावर असतानाही तिने उपांत्य फेरी गाठली होती.