भारतीय महिला-पुरूष खो-खो संघाचे कर्णधार काय करतात? त्यांचा पगार किती? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 12:27 IST2025-01-17T11:45:37+5:302025-01-17T12:27:39+5:30

Indian Captains Pratik Waikar Priyanka Ingle, Kho Kho World Cup 2025 : प्रियंका इंगळे आणि प्रतीक वायकर हे दोघेही सध्या तुफान फॉर्मात असून भारताला मोठे विजय मिळवून देत आहेत

शालेय खेळ म्हणून चर्चा असलेल्या खो-खो खेळाची पहिलीवहिली विश्वचषक स्पर्धा भारतात सुरु आहे. भारताचा पुरुष आणि महिला संघ अपेक्षेप्रमाणे तुफानी कामगिरी करताना दिसत आहे.

प्रतीक वायकर आणि प्रियांका इंगळे ही दोन नावे सध्या खो-खो जगतात चर्चेत आहेत. भारताला खो खो चा पहिला विश्वविजेता बनवण्याची सर्व जबाबदारी या दोघांच्या खांद्यावर आहे.

भारतीय महिला खो खो संघाची कर्णधार प्रियांका इंगळे आहे. तर प्रतिक वाईकर भारतीय पुरुष खो खो संघाचे नेतृत्व करत आहे. हे दोघेही खो खो विश्वचषकातून नाव कमावत आहेत.

पण तुम्हाला माहिती आहे का की, या खेळाव्यतिरिक्त दोन्ही भारतीय कर्णधार काय करतात आणि त्यांचा पगार किती आहे? चला जाणून घेऊया त्यांच्या कामाबद्दल...

भारतीय महिला खो खो संघाची कर्णधार प्रियांका इंगळे ही महाराष्ट्राची कन्या आहे. २०२३ मध्ये चौथ्या आशियाई खो-खो स्पर्धेत तिने सुवर्णपदक जिंकले आहे.

यापूर्वी २०२२ मध्ये तिला राष्ट्रीय स्तरावर राणी लक्ष्मीबाई पुरस्कारही मिळाला आहे. तिने आपल्या १५ वर्षांच्या खो खो कारकिर्दीत २३ राष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे.

खो खो खेळण्यासोबतच प्रियांका इंगळे नोकरीही करते. तिने वाणिज्य शाखेत पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. आता ती मुंबईत आयकर विभागात कर सहाय्यक म्हणून काम करते.

या पदासाठी दरमहा २५,५०० ते ८१,००० रुपये वेतन दिले जाते. प्रियांकाला नुकतीच महाराष्ट्र सरकारने क्रीडा विभागात ग्रेड 2 ची नोकरी ऑफर केली आहे.

भारतीय खो खो संघाचा कर्णधार प्रतीक वायकर याचे खो खो शी विशेष आणि खोल नाते आहे. अवघ्या आठ वर्षांचा असताना त्याने या खेळात रस दाखवला.

प्रतीकने अल्टीमेट खो-खो लीगमध्ये तेलुगू वॉरियर्सचे नेतृत्वही केले आहे. तसेच राष्ट्रीय खो खो स्पर्धेत महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून देण्यात महत्त्वाचे योगदान दिले आहे.

भारतीय पुरुष खो खो संघाचा कर्णधार प्रतीक हा उच्चशिक्षित आहे. त्याच्याकडे फायनान्समधील पदवीसोबतच कॉम्प्युटर सायन्सची पदवी अशा दोन डिग्री आहेत. क्रीडा कोट्यातून त्याला नोकरी मिळालेली आहे.